AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambenali Ghat Accident : 8 मित्र, 800 फूट खोल दरी आणि… दुर्बीणने मृतदेहांचा शोध ! आंबेनळी घाटातील अंगावर काटा येणारं रेस्क्यू ऑपरेशन; मृतांची नावे समोर

राज्यातील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण स्कॉर्पिओ अपघातात 8 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोकणच्या सफरीवरून परतताना गाडी 1500 फूट खोल दरीत कोसळली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, बचाव पथकांनी दुर्बीणींच्या साहाय्याने मृतदेहांचा शोध सुरू केला आहे. हा अपघात 2018 च्या बस दुर्घटनेची आठवण करून देतो.

Ambenali Ghat Accident :  8 मित्र, 800 फूट खोल दरी आणि...  दुर्बीणने मृतदेहांचा शोध !  आंबेनळी घाटातील अंगावर काटा येणारं रेस्क्यू ऑपरेशन; मृतांची नावे समोर
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात
| Updated on: May 25, 2026 | 10:01 AM
Share

Raigad Scorpio Accident News : राज्यातील महाबळेश्वर आणि पोलादपूर दरम्यान असलेल्या धोकादायक आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघाताने सगळेच हादरले आहेत. कोकणच्या सफरीवरून परत येणाऱ्या पर्यटकांना घेऊन जाणारी स्कॉर्पिओ जीप अचानक अनियंत्रित झाली आणि खोल दरीत कोसळली. या अत्यंत भीषण अपघातात 8 तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही दरी 1500 फूट खोल आहे. अपघाताचाी माहिती मिळताच बचाव आणि मदत पथकाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. दुर्बीणीच्या मदतीने मृतदेहांचा शोध घेतला जात होता.

प्राथमिक अहवालानुसार, हा भीषण अपघात रविवार आणि सोमवारी पहाटे 2:45 च्या सुमारास दाबेली गावाजवळ घडला. अपघातात सामील असलेली स्कॉर्पिओ जीप सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या आसगाव येथील असल्याचे समजते. कोकणात सुट्टी घालवून काही मित्र घरी परत जात होते. मात्र पहाटेच्या वेळी ते आंबेनळी घाटाजवळ पोहोचले असतानाच अचानक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ही जीप थेट 800 फूट खोल दरीत कोसळली.या अपघातामुळे मोठी शोककळा पसरली.

दुर्बिणीच्या मदतीने घेतला जातोय मृतदेहांचा शोध

या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड बचाव पथक, सिस्केप महाड, आपडा मित्र आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. ही दरी प्रचंड खोल असल्यामुळे आणि तो भाग दुर्गम असल्यामुळे बचाव पथकांतील कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मृतदेह शोधण्यासाठी दुर्बिणींचा वापर केला जात आहे. ही गाडी खोल दरीत कोसळल्यामुळे मृत प्रवाशांचे मृतदेह वर आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. आतापर्यंत दोन मृतदेह सापडले असून, उर्वरित 6 जणांचा शोध घेण्यासाठी मोठी बचाव मोहीम सुरू आहे. दोघांचे मृतदेह घेऊन रुग्णवाहिका पोलादपूरमधील सरकारी रुग्णालयात गेली आहे.

2018 च्या बस अपघाताच्या आठवणी ताज्या

अपघातात सामील असलेली स्कॉर्पिओ कार सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या आसगाव येथील असल्याचे समजते. मित्रांचा एक ग्रुप कोकणातून साताऱ्याला परत येत असताना हा अपघात घडला. पहाटेच्या सुमारास झालेला हा अपघात त्याच परिसरात घडली आहे, जिथे 2018 साली दापोली कृषी विद्यापीठाची एक बस दरीत कोसळली होती.

मृतांची नावं आली समोर

सर्व मृतक हे सातारा व आसपासचे रहिवासी असल्याचे समजते. त्यांची नावं समोर आली आहेत.

महेश अनिल पवार (वय 25 ), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25) आणि नितीन किसन नायकोंडे (वय 35)

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ