AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिणीच्या लग्नाला पैसे साठवण्यासाठी डिलिव्हरी बॉय झाला अन् एका क्षणात… अंबरनाथ अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, कुटुंब हादरले

अंबरनाथ पुलावरील भीषण अपघातात चार जणांचा बळी गेला, ज्यात १७ वर्षीय डिलिव्हरी बॉय सुमित चेलानीचाही समावेश आहे. बहिणीच्या लग्नासाठी पैसे कमवणाऱ्या सुमितचा भरधाव कारच्या धडकेने दुर्दैवी अंत झाला.

बहिणीच्या लग्नाला पैसे साठवण्यासाठी डिलिव्हरी बॉय झाला अन् एका क्षणात... अंबरनाथ अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, कुटुंब हादरले
Ambernath Accident (1)
| Updated on: Nov 23, 2025 | 8:31 AM
Share

अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या अनेक दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात उल्हासनगर येथील १७ वर्षीय सुमित चेलानी याचा मृत्यू झाला आहे. यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बहिणीच्या लग्नाची तयारी आणि आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पार्ट-टाईम डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या सुमितचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.

नेमकं काय घडलं?

सुमित हा उल्हासनगरातील एका हार्डवेअर दुकानात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. कुटुंबाला हातभार लागावा आणि बहिणीच्या लग्नासाठी काही पैसे साठवता यावेत, यासाठी तो दिवसरात्र झटत होता. १८ नोव्हेंबरला सायंकाळी सुमित इलेक्ट्रिक दुचाकीवरून माल घेऊन अंबरनाथकडे जात होता. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण चौबे यांच्या भरधाव वेगात असलेल्या कारने त्याला आणि इतर दुचाकीस्वारांना तसेच पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सुमित लांब फेकला गेला आणि त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

सुमितच्या निधनामुळे त्याच्या गरीब कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. ज्या बहिणीच्या लग्नाची तजवीज करण्यासाठी तो जीवापाड मेहनत करत होता, तिच्या डोळ्यादेखत भावाचे पार्थिव पाहण्याचे दुर्भाग्य ओढवले आहे. सुमितचे शेजारी सनी मलकानी यांनीही याबद्दल हळहळ व्यक्त केली. सुमितच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत आहे. सुमितच्या कुटुंबाला सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी कळकळीची विनंती आहे. तसेच या घटनेबद्दल प्रचंड दु:ख होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

एकूण चार जणांचा मृत्यू

हा भीषण अपघात किरण चौबे हे संघटनेच्या सभेसाठी जात असताना झाला. अपघातानंतर चौबे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालवणाऱ्या लक्ष्मण शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातात सुमित चेलानीसह चालक लक्ष्मण शिंदे, अंबरनाथ महानगरपालिकेचे दोन कर्मचारी आणि एक पादचारी नागरिक अशा एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेले उमेदवार किरण चौबे यांना तातडीने कल्याणच्या फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात अपघाताचा संपूर्ण थरार कैद झाला आहे. अपघातानंतर पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अंबरनाथ पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत अनेक जणांचे जबाब नोंदवले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Follow Us
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार.

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार