AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण?; मिटकरींचा सवाल

दिल्लीतील हिंसाचार ज्यांनी घडवून आणला त्यांच्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते का बोलत नाहीत, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. (amol mitkari slams ashish shelar on tractor rally)

आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण?; मिटकरींचा सवाल
अमोल मिटकरी
| Updated on: Jan 27, 2021 | 12:30 PM
Share

अकोला: दिल्लीतील हिंसाचार ज्यांनी घडवून आणला त्यांच्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते का बोलत नाहीत, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे. दिल्ली हिंसाचाराला जबाबदार असलेले अभिनेते दीप सिद्धू हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं समोर आलं आहे. त्यावर शेलार का बोलले नाहीत? असा परखड सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच सिद्धू तुमचा कोण लागतो?, असा सवालही त्यांनी केला आहे. (amol mitkari slams ashish shelar on tractor rally)

अमोल मिटकरी यांनी ट्विट करून आशिष शेलार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचे मूकपणे समर्थन करीत आहेत. दिल्लीच्या हिंसाचारा मागे भाजपचा कार्यकर्ता दीप सिद्धू असल्याचा आरोप शेतकरी का करत आहेत? याचे उत्तर शेलार यांनी दिले नाही, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.

मिटकरी यांनी दोन ट्विट करून शेलार यांना घेरलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये तर त्यांनी थेट दीप सिद्धूवरून शेलारांना सवाल केला आहे. आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण?, असा परखड सवाल त्यांनी शेलार यांना केला आहे.

शेलार काय म्हणाले होते?

शेलार यांनी आज माध्यमांशी चर्चा करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. शेलार यांनी खासकरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. “कधी काळी आवश्यक वाटल्यास फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार… कालच्या घटनेवर तुम्ही फेसबुक पोस्ट का टाकली नाही… पवारसाहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलिसांच्या बाजूने का आली नाही… आंदोलनात जो वावर आणि वाद पहिल्यापासून चालू आहे त्याचे समर्थन शरद पवार , संजय राऊत यांनी केलं. मग काल हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली?, असा घणाघाती हल्ला शेलार यांनी केला आहे.

राऊत यांचा सवाल

“रोज वचवच करणारे संजय राऊत कालच्या घटनेवर काही बोलले नाहीत. संजय राऊतांना माझा सवाल आहे की, रोज कोणत्याही विषयावर बोलायला जमतं मग काल देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत?”, असा सवालही त्यांनी केला होता. (amol mitkari slams ashish shelar on tractor rally)

संबंधित बातम्या:

शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?, आशिष शेलारांचा हल्लाबोल

ठाकरे सरकारकडून विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालत ‘सामंतशाही’ : आशिष शेलार

घराबाहेर पडण्यासाठीच रस्त्यावर उतरण्याचा बहाणा; शेलारांची खोचक टीका

(amol mitkari slams ashish shelar on tractor rally)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली