AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

108 मुली, 18 व्हिडीओ अन्… परतवाड्यातील नराधमांनी तरुणींना कसे अडकवले?

अमरावतीतील परतवाड्यात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओंद्वारे ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. 

108 मुली, 18 व्हिडीओ अन्... परतवाड्यातील नराधमांनी तरुणींना कसे अडकवले?
Amravati Paratwada Case
| Updated on: Apr 16, 2026 | 7:52 AM
Share

अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आतापर्यंत याप्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज उर्फ मोहम्मद तनवीर याचे अवैध बांधकाम प्रशासनाने बुलडोझरच्या साहाय्याने पाडून टाकले आहे. या घटनेचे पडसाद अचलपूर-परतवाडा परिसरात उमटले असून आज कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच आता या महिलांना जाळ्यात कसे अडकवण्यात आले, याची माहिती समोर आली आहे.

परतवाडा परिसरातील तरुणींचे लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगचे प्रकरण हे केवळ एका गुन्ह्यापर्यंत मर्यादित नाही. त्यामागे एक सुनियोजित आणि भयानक ट्रॅप असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. मुख्य आरोपी मोहम्मद अयाज उर्फ मोहम्मद तनवीर आणि त्याच्या तीन साथीदारांनी कशाप्रकारे निरागस मुलींना आपल्या जाळ्यात ओढले, त्यांचे लैंगिक शोषण कसे केले याची माहिती आता बाहेर येत आहे.

भावनिक फसवणुकीची सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार, परतवाड्यातील आरोपींनी सोशल मीडियाचा वापर करून तरुणींशी संपर्क साधला. सुरुवातीला त्यांच्याशी मैत्रीचे नाटक करत त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यात त्यांनी तरुणींचा विश्वास संपादन केला. मुख्य आरोपी मोहम्मद अयाज याने स्वत:चे नाव तनवीर असल्याचे सांगून आपली ओळख लपवली होती. अनेक मुलींना हे माहितीच नव्हते की, आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत, तो व्यक्ती प्रत्यक्षात कोण आहे. एकदा का मुलींचे भावनिक नाते जुळले की आरोपी त्यांना एकांतात भेटण्यासाठी प्रवृत्त करायचे.

या तरुणी प्रेमाच्या जाळ्यात अडकल्यानंतर आरोपी त्यांची पुढची पाऊल टाकायला सुरुवात करायचे. खाजगी भेटीदरम्यान प्रेमाच्या आणाभाका घेत असताना आरोपी अत्यंत हुशारीने तरुणींचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढायचे. त्यानंतर यातील अनेक व्हिडीओ हे तरुणींच्या नकळत त्यांना दाखवून त्यांना धमकावले जायचे. एकदा का ही आक्षेपार्ह सामग्री आरोपींच्या हाती लागली की ब्लॅकमेलिंग केली जायची. जर पोलिसांकडे किंवा घरच्यांकडे तक्रार केली, तर हे व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी दिली जायची. त्यानंतर आरोपींकडून पीडित मुलींचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले.

१०८ मुलींना केले टार्गेट

या प्रकरणात मुख्य आरोपीला त्याचे साथीदार उझर खान, तरबेज खान आणि मोहम्मद साद यांची पूर्ण साथ होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी उझर खान याने मोहम्मद सादला तरुणींचे अश्लील व्हिडीओ पाठवल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे हे केवळ एका व्यक्तीचे कृत्य नसून संपूर्ण टोळी यात काम करत असल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे फसवणूक करत तब्बल १०८ मुलींना या नराधमांनी टार्गेट केल्याचा संशय आहे.

दरम्यान अमरावती पोलिसांनी आतापर्यंत १८ अश्लील व्हिडिओ आणि ३९ फोटो जप्त केली आहेत. तसेच याप्रकरणी पीडित तरुणींनी घाबरून न जाता समोर यावे. पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता ४७ सदस्यीय एसआयटी (SIT) कडून याचा अधिक कसून तपास सुरु आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...