Jayant Patil : पवारांच्या घरावरील हल्ल्याचा हिशेब चुकता करणार, जयंत पाटलांचा इशारा

| Updated on: Apr 10, 2022 | 8:19 PM

अजूनही राजकारण शांत झालेलं नाही. या प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सादवर्ते यांना अटक झाली आहे. ते सध्या कोठडीत आहेत. तर शंभरहून अधिक कर्मचारीही एसटी कर्मचारी अटकेत आहेत. अशात जयंत पाटलांनी (Jayant Patil) पुन्हा या आंदोलनावरून शंका उपस्थित केली आहे.

Jayant Patil : पवारांच्या घरावरील हल्ल्याचा हिशेब चुकता करणार, जयंत पाटलांचा इशारा
जयंत पाटलांचा पुन्हा कडकडीत इशारा
Image Credit source: tv9
Follow us on

वर्धा : दोन दिवसांपूर्वीच पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचं आक्रमक (St Worker Protest) आंदोलन शरद पवारांच्या घारबाहेर झालं. त्यावरून अजूनही राजकारण शांत झालेलं नाही. या प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सादवर्ते यांना अटक झाली आहे. ते सध्या कोठडीत आहेत. तर शंभरहून अधिक कर्मचारीही एसटी कर्मचारी अटकेत आहेत. अशात जयंत पाटलांनी (Jayant Patil) पुन्हा या आंदोलनावरून शंका उपस्थित केली आहे. जेव्हा जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांवर संकट आलं 40 वर्षांत तेव्हा शरद पवार साहेबांनी मदत केली. पवार साहेब, काकी आणि नात घरी असताना 100 ते 150 लोक घरावर आले.पवार साहेबांच्या घरावर हल्ला झाला. मात्र पवार साहेबांच्या घरावर आलेले लोक एसटीचे होते की नाही यात शंका आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

आंदोलनावरून आरोप-प्रत्यारोप

तसेच ही लोक पाठवायचं काम कोणी केलं? यामागे कुणाचं षड्यंत्र आहे? हे महाराष्ट्राला माहित आहे. पोलीस या प्रकरणाच्या शेवटपर्यंत जातील आणि हे कृत्य कुणी केलं हे शोधातील. पवार साहेब यांच्या घरावर झालेला हल्ला इतका साधेपणानं घेणार नाही. पवार साहेबांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही. असा थेट इशाराच जयंत पाटील यांनी दिला आहे. तर हा हल्ला केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी राष्ट्रवादीनेच करवून आणला का, अशी शंका भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे. तर काही भाजप नेत्यांनी शिवसेला गृहमंत्रिपद हवं आहे, म्हणून शिवसेनेने हा हल्ला घडवून आणलेला असू शकतो, अशीही शंका व्यक्त केली आहे.

सरकार पडण्यासाठी दबाव

तसेच जयंत पटलांनी इतरही काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. आमदार फुटतील आणि आम्ही तिथे जाऊ बसू अशी स्वप्न पाहणारे अनेक आहेत. हे सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात ठेऊन बसले. मागच्या सात मार्चला सरकार पडणार अशी तारीख दिली, अडीच वर्षांत जी तारीख दिली ती खरी ठरली नाही. पक्ष फुटू नये म्हणून भाजप तारखा देतात. सरकारमधील अधिकाऱ्यांना सांगतात आमचं सरकार येतंय आमचं काम करा. पण आमदार फुटत नाहीत, कुठलाही पक्ष दाद देत नाही. म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय. अनिल देशमुख यांच्या घरावर 110 वेळा तपास यंत्रणांनी धाडी घातल्या. अनिल देशमुख यांचे चिरंजीव ताठ माथेनं पक्षात काम करणार आहेत. अनिल देशमुख यांना तुरुंगात सांगितले या नेत्यांच्या विरोधात बोला, पण ते वाकले नाही. नवाब मलिक यांनी 20 वर्षांपूर्वी जमिन घेतली. त्याची डायरेक्ट ईडीकडे तक्रार केला आणि ईडीच्या तुरुंगात राहावं लागतंय. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर गुन्हा सिद्ध व्हायचा आहे. तरीही ते तुरुंगात आहेत, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.

एका क्षणात पवारांनी सत्तेचे चित्र पालटले; मी पुन्हा येईल म्हणणारे पहात बसले; खडसेंचा फडणवीसांना टोला

Devendra Fadnavis : भोंगे वाजवल्याने राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्याने राग का येतो?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

CM Uddhav Thackeray : मोदींनी रेशन दिलं पण आता रिकामा सिलेंडर वाजवायचा का? महागाईवरून मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा