एका क्षणात पवारांनी सत्तेचे चित्र पालटले; मी पुन्हा येईल म्हणणारे पहात बसले; खडसेंचा फडणवीसांना टोला

राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार म्हणनारे राज्यातील राजकारण बिघडवत असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

एका क्षणात पवारांनी सत्तेचे चित्र पालटले; मी पुन्हा येईल म्हणणारे पहात बसले; खडसेंचा फडणवीसांना टोला
भाजपचा आक्रोश मोर्चा म्हणजे दुटप्पीपणाः एकनाथ खडसेImage Credit source: File Photo
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 7:54 PM

नागपूर : राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार म्हणनारे राज्यातील राजकारण बिघडवत असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा मीच मुख्यमंत्री होणार असं त्यांना वाटत होतं, मात्र त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे ते सरकार अस्थिर करत असल्याची टीका खडसे यांनी फडणवीसांचे नाव न घेता केली आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हे भ्याडपणाचे लक्षण होते. पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागचे सुत्रधार देखील हेच असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष वारवांर महाविकास आघाडी सरकार आता पडणार असे चित्र निर्माण करत आहे. विरोधी पक्ष सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसला आहे, मात्र त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ते राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यात बोलत होते.

फडणवीसांना टोला

यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मी पुन्हा येणार असे फडणवीस म्हणत होते. त्यांना वाटत होते की मला कोणाचेच आव्हान नाही, मात्र त्यांच्यासमोर शरद पवारांसारख्या तेल लावलेल्या पहिलवानाचे आव्हान होते. त्यांनी एका क्षणात राज्यातील सत्तेचं चित्र पालटलं. विरोधकांकडून कितीही वेळा महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. राज्यातील सरकार स्थिर असून, ते आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे कोणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करू नये असे खडसे यांनी म्हटले आहे.

विदर्भातील पोकळी भरून काढण्याची गरज

पुढे बोलताना खडसे यांनी म्हटले आहे की, विदर्भात शरद पवार यांना माणणारा मोठा वर्ग आहे. प्रयत्न केल्यास विदर्भात देखील राष्ट्रवादी नंबर वन पक्ष होऊ शकतो. मात्र त्यासाठी विदर्भातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबाबत जी पोकळी आहे, ती सर्व प्रथम भरून काढावी लागेल. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सध्या निच पातळीचे राजकारण सुरू आहे. राजकारणाची ही पातळी मी कधी पाहिली नव्हती असे देखील खडसे यांनी यावेळी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : भोंगे वाजवल्याने राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्याने राग का येतो?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

CM Uddhav Thackeray : मोदींनी रेशन दिलं पण आता रिकामा सिलेंडर वाजवायचा का? महागाईवरून मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा

अविश्वासाने स्थापन झालेल्या सरकारसाठी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना त्याग करायला सांगतात; चंद्रकांत पाटलांचा टोला

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.