आज होणार फैसला! कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत महत्वाची बैठक, अभिजीत दिपके यांच्या..
जंतर मंतवरील आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले. या आंदोलनामध्ये सरकारला थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. कॉकरोच जनता पार्टीची आज महत्वाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आहे.

जंतर मंतरवरील आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले. या आंदोलनामध्ये सरकारला थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. कॉकरोच जनता पार्टीची आज महत्वाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आहे. अमेरिकेतून भारतात दाखल होत अभिजीत दिपके यांनी भारतात मोठे आंदोलन उभारले. त्यांच्या या आंदोलनाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. जंतर मंतरवर देशभरातून विद्यार्थी दाखल झाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू झाले. देशभरातील शहरांमध्ये विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले. शेवटी सरकारला विद्यार्थ्यांसमोर झुकावे लागले आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे हा सरकारला मोठा झटका आहे. जंतर मंतवरील आंदोलनानंतर उपचार घेऊन अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. कुटुंबियांनी अभिजीत दिपकेंचे मोठे स्वागत केले. छत्रपती संभाजीनगर दाखल झाल्यानंतर अभिजीत दिपकेंनी मोठी घोषणा केली.
अभिजीत दिपके यांनी आपल्या पक्षाची महत्वाची बैठक छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या घरी बोलावली. या बैठकीत पक्षाची पुढील दिशा ठरणार आहे. ध्येय धोरणेही स्पष्ट केली जाणार आहेत. E20 इंधनाच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टी उतरणार असल्याची चर्चा आहे. यावरही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे काही सदस्य छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालीत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये CJP च्या कोअर कमिटीची दोन दिवस बैठक चालेल. आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर चर्चा होणार. सौरभ दास, आशुतोष रांका यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या बैठकीत नक्की काय निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या पहिल्याच आंदोलनात त्यांना घणघणीत यश मिळाले.
देशातील आतापर्यंत एकही विरोधी पक्ष नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकला नाही. आता पुढे कॉकरोच जनता पार्टी नक्की काय करणार याकडे देशाच्या नजरा आहेत. सर्वांचे लक्ष आता छत्रपती संभाजीनगरकडे आहे. काही दिवसांपूर्वीच अभिजीत दिपके यांनी दावा केला की, भाजपामध्ये दाखल होण्यासाठी आपल्याला ऑफर मिळाली होती. मात्र, भाजपाने हा दावा फेटाळून लावला.