AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके यांचे थेट पंतप्रधान मोदी यांना मोठे चॅलेंज, म्हटले, अगोदर तुमची डिग्री..

अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. यादरम्यानच त्यांच्या विदेशातील शिक्षणाबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अभिजीत यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मोठे चॅलेंज दिले.

अभिजीत दिपके यांचे थेट पंतप्रधान मोदी यांना मोठे चॅलेंज, म्हटले, अगोदर तुमची डिग्री..
PM modi and Abhijit Dipke
| Updated on: Aug 03, 2026 | 12:48 PM
Share

अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने मोठा धमाका केला. अमेरिकेत अभिजीत दिपके शिक्षण घेत असताना नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात ते भारतात दाखल झाले आणि त्यांनी मोठे आंदोलन उभारले. फक्त आंदोलनच नाही तर त्यांच्या आंदोलनात जेंनझी रस्त्यावर उतरले. त्यानंतर अभिजीत दिपके यांच्यावर गंभीर आरोप झाले. सतत अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला विदेशातून पैसा पुरवण्यात आल्याचाही आरोप करण्यात येतोय. हेच नाही तर अभिजीत दिपके याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती तपासण्याचीही मागणी करण्यात आली. यावर अभिजीत दिपकेंनी स्पष्ट केले की, आपल्या विदेशातील शिक्षणावर खर्च नक्की कोणी केला. यादरम्यानच आज अभिजीत दिपके यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मोठे चॅलेंज दिले.

मी माझे स्कॉलरशिपचे लेटर आणि डिग्रीचे लेटर दाखवायला तयार आहे. पण माझे म्हणणे आहे की, पंतप्रधानांनीही त्यांची डिग्री दाखवायला हवी आणि ती सार्वजनिक करायला हवी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मीही माझे स्कॉलरशिपचे लेटर आणि शिक्षणाची डिग्री सार्वजनिक करायला तयार आहे. त्यांना माझ्या घरापर्यंत येऊन द्या आणि त्यांना जी चाैकशी करायची आहे ती करू द्या.

जेव्हा जेव्हा या देशात सरकारविरोधात बोलले जाते, त्यावेळी अशा गोष्टी होतात. जेव्हा जेव्हा या सरकारविरोधात लोकांनी आवाज उठवला, प्रश्न विचारले हे लोक तेच करतात ईडी, सीबीआय पाठवतात. तुमची ईडी पाठवा, सीबीआय पाठवा. पण मी जसे म्हटले की, मी माझ्या शैक्षणिक कर्जाचे लेटर दाखवण्यास तयार आहे, माझे स्कॉलरशिपचे लेटर दाखवायला तयार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर ईडीला पाठवत असतील तर त्यांनी ईडीसोबत त्यांची डिग्री पाठवावी. आता अभिजीत दिपके यांनी थेट एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच चॅलेंज दिल्याचे बघायला मिळतंय. आता अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून नवा वाद निर्माण झाला. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अभिजीत दिपकेंकडून वारंवार बोलले जात आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं