AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉकरोच पार्टीवाल्या अभिजितच्या आईला वाटतेय भीती, मुलाबद्दल व्यक्त केली चिंता; म्हणाल्या तो गेला की…

कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके याची आई अनित दीपके यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांनी अभिजितबद्दल बरीच काही माहिती दिली आहे. त्यांनी अभिजितने नोकरी करावी, असे मत व्यक्त केले आहे.

कॉकरोच पार्टीवाल्या अभिजितच्या आईला वाटतेय भीती, मुलाबद्दल व्यक्त केली चिंता; म्हणाल्या तो गेला की...
abhijeet dipke and cockroach janata partyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 21, 2026 | 9:19 PM
Share

Cockroach Janta Party : देशात सध्या कॉकरोच जनता पार्टीचा सगळीकडे बोलबाला आहे. छत्रपती संभाजीनगरातील अभिजीत दीपके नावाच्या तरुणाने कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने एक सोशल मीडिया चळवळ चालू केली आहे. रोजगार, शिक्षण, भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्यासाठी त्याने हा पक्ष काढला आहे. हा पक्ष नोंदणीकृत नाही. परंतु सोशल मीडियावर त्याने सुरू केलेल्या या मोहिमेला तुफान प्रतिसाद लाभत आहे. अवघ्या चार दिवसात कॉकरोच जनता पार्टीच्या इन्स्टाग्राम खात्यावर कोट्यवधी फॉलोअर्स झाले आहेत. अभिजित या कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरत आहे. दरम्यान, अभिजीतची देशभरात चर्चा होत असताना आता त्याचे आई-वडील समोर आले आहेत. त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली आहे. मुलगा प्रसिद्ध झाल्यानंतर आता त्याला कुठून तरी उचलवून नेतील की काय? सरकार काय करेल हे सांगता येत नाही, अशा शब्दांत भीती व्यक्त केली आहे.

एका मुलीने सांगितलं की काकू…

अभिजीत हे असं कसं करू शकला, असा प्रश्न पडतो. तो सहज एक शब्द बोलला. गेला आणि लगेच त्याच्यामागे एवढे सारे लोक उभे राहिले. तो प्रामाणिक मुलगा आहे, असे लोकांनाही वाटत असेल. मला एका मुलीने सांगितलं की काकू अभिजीतला युट्युबवर बघा. त्याने कॉक्रोज पक्ष काढला, असं मला त्या काकूंनी सांगितलं. मी लगेच त्याला कॉल लावला तर तो म्हटला मम्मी मी तुला सविस्तर नंतर बोलेल.मला आनंदही वाटतो आणि दुःखही वाटत आहे. तो गेला तर सुरक्षित राहणार नाही. त्याला कुठून तरी उचलतील. सरकार काय करेल काही सांगता येत नाही, अशा भावना अभिजित दीपकेच्या आई अनिता दीपके यांनी व्यक्त केल्या.

आम आदमी पार्टीसोबत होता तेव्हा…

मनात भीती वाटते. मला काही दोन-तीन मुलं नाहीत. तो एकटाच मुलगा आहे. त्याच्यामुळे मनात दुःख वाटतं. तो जेव्हा आम आदमी पार्टीसोबत काम करत होता तेव्हा तो सुरक्षित आहे असं वाटतं. तो दोन-तीन वर्ष तो तिथे होता, तिथे काम करायचं तर वाटायचं तो सुरक्षित आहे, असेही मत अनिता दीपके यांनी व्यक्त केले.

त्याने कुठेतरी छान नोकरी करावी

आमच्या घरात कोणीही राजकारणात नाही. त्यामुळे मला काही अपेक्षा नव्हती. त्याने कुठेतरी छान नोकरी करावी अशी माझी अपेक्षा होती. माझ्या सासरी किंवा माहेरीसुद्धा कोणीही राजकारणात नाही. आता त्याच्या मनात काय आहे ते मला माहीत नाही. त्याची आणि आमची एका वर्षापासून भेट झाली नाही. तो फक्त फोनवरच बोलतो, असेही अनिता दीपके यांनी सांगितले.

तो राजकारणात गेला तर पाठिंबा नसेल

राजकारणात गेला तर आमचा त्याला पाठिंबा नसेल. त्याने नोकरी करावी हेच मला वाटतं. राजकारणात थोडंसं काय झालं की लोक चप्पल मारतात. शाई फेकतात त्यामुळे मनात दुःख दुखी वाटते. परवाच्या दिवशी त्यांनी कॉल लावला होता. तो म्हटला होता नंतर कॉल करतो. त्याने अजूनही त्यांनी कॉल केला नाही, असेही अनिता दीपके यांनी सांगितले.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ