AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 दिवसांनी मोठा खुलासा करणार… माझ्याकडे महत्त्वाची माहिती, अंजली दमानियांच्या रडारवर कोण?

Anjali Damania : अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं आहे. सात दिवसांनंतर मोठा खुलासा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता दमानिया यांच्या रडारवर कोण आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

7 दिवसांनी मोठा खुलासा करणार... माझ्याकडे महत्त्वाची माहिती, अंजली दमानियांच्या रडारवर कोण?
Anjali DamaniaImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 06, 2026 | 6:49 PM
Share

सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना दमानिया यांनी म्हटले की, अंधारे ताईंना एवढंच सांगायचंय की माझी तुमच्याशी स्पर्धा नाही. माझा लढा तुमच्याशी नाही तर भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. सुषमा ताई जे चेहऱ्यावर हास्य ठेवून दमानिया मॅडम असं करू नका असं म्हणत त्यांनी अंधारे यांची नक्कल केली आहे. पुढे बोलताना दमानिया यांनी आगामी काळात मोठे खुलासे करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अंजली दमानिया मोठा खुलासा करणार

अंजली दमानिया यांनी म्हटले की, मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी सुषमा अंधारे बोलत नाहीत, ते शिंदेंच्या पक्षात जाण्याची चर्चा आहे. मिलिंद नार्वेकर यांचे 8 कॉल्स , मग सिलेक्टिव्ह कोण? मी पुढील पाच दिवस बाहेर जात आहे, आल्यावर मोठा खुलासा करणार आहे. माझ्याकडे असंख्य माहिती आहे, यानंतर मोठा खुलासा होणार आहे जो भयंकर आहे. कोंडी करायचा प्रयत्न होत असेल पण सुषमा अंधारे यांचा मोर्चा शिंदे यांच्याकडे गेलाय हे पाहून बरं वाटलं. बिल्डर्स , रिपीडेट कॉल्सची माहिती घेतली आहे, सात दिवसांनी मोठा आणि शॉकिंग खुलासा होईल असं दमानिया यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अंजली दमानिया नेमका काय खुलासा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भोंदू खरात आणि अजित दादांच्या विमान अपघाताचा संबंध असण्याची शक्यता

दमानिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, भोंदू खरात आणि अजित दादांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आरोप केला आहे. भोंदू अशोक खरातचा या अपघाताशी संबंध असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. अजित दादांच्या अपघातानंतर भोंदू खरातच्या समता पतसंस्थेतून काही संशयास्पद मेसेज व्यवहार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी एसआयटीकडे करणार असल्याचेही दमानिया यांनी म्हटले आहे.

रोहित पवारांची सीआयडी तपासाची मागणी

अंजली दमानिया यांच्या या आरोपांनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले की, ‘अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती, भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमांनामधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का? यासंदर्भातील संशय अधिक गडद होत आहे. अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना सीआयडीने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा.’

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त