Anjali Damania | मोठा खुलासा! अजित दादांच्या अपघातानंतर भोंदू खरातच्या संस्थेतून… दमानियांचा खळबळजनक दावा
सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. दरम्यान भोंदू अशोक खरातच्या पतसंस्थेतील काही पैश्याचे संशयास्पद व्यहारही दमानियांनी उघड केले आहेत. इतकेच नाही तर याचा अजित पवारांच्या अपघाताशी संबंध का असू शकतो हेही सांगितले.
सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. तसेच अनेक नेत्यांचे अशोक खरातसह फोटोदेखील व्हायरल झाले. इतकेच नाही तर अनेक नेत्यांनी खरातला फोन कॉल केल्याचेही आरोप आहेत. या आरोपांची पुर्ताता करत समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या फोन कॉलशिवाय भोंदू खरातच्या पतसंस्थेतील काही पैश्याचे व्यहारही दमानियांनी उघड केले आहेत.
भोंदू अशोक खरातच्या समता पतसंस्थेतून काही संशयास्पद मेसेज व्यवहार झाल्याचं अंजली दमानियांनी सांगितले, पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, संबंधित पतसंस्थेचे महिन्याला कधी दोन कधी आठ कधी सात असे मेसेजेस यायचे मात्र अजिपत पवारांचा अपघात झाला त्या दिवसी तब्बल 19 व्यव्हारांचे मेसेजेस आले आहेत. त्याच्या दुसऱ्याची दिवशी आठ व्यव्हारांचे मेसेज नंतर दहा आणि त्याच्याही नंतर आठ असे मेसेजसे आहेत. ही सर्व माहिती मी SIT कडे देणार आहे. यावेळी त्यांनी सुषमा आंधारे यांनाही सुनावलं असून ‘मी खरी माहिती आणते, राजकारण करत नाही तर खरात विरोधात लढतेय. तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत जाऊ नका, असं स्पष्ट सांगितलं.
Published on: Apr 06, 2026 12:51 PM
शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... राहुल गांधींच्या मोहिमेची तयारी
भाजपच्या पायाखालील वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड...
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश,
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक रद्द

