AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा, राज्यात खळबळ

पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानं राज्यात खळबळ उडाली होती, पुण्यातील 40 एकर जमिनीशी संबंधित हे प्रकरण आहे, दरम्यान त्यानंतर आता आणखी एक मोठा जमीन घोटाळा उघड झाला आहे.

मोठी बातमी! पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा, राज्यात खळबळ
जमीन घोटाळा Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 13, 2025 | 2:58 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमिनीशी संबंधित प्रकरणात जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे, हे प्रकरण राज्यभरात चांगलंच तापलं. पार्थ पवार यांची कंपनी असलेल्या अमेडिया कंपनीशी संबंधित हे प्रकरण आहे. 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली. तसेच त्याच्यावर सरकारी नियमानुसार 6 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित असताना केवळ 500 रुपये इतकीच स्टॅम्प ड्युटी भरण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणामुळे पार्थ पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दरम्यान हे प्रकरण ताजं असतानाच आता पुणे जिल्ह्यातून आणखी एक जमीन घोटाळा प्रकरण समोर आलं आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

मुंढवा आणि बोपोडी जमीन प्रकरणा पाठोपाठ पुन्हा एकदा शासकीय जमीन विक्री घोटाळा समोर आला आहे.  ताथवडे येथील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील पशुसंवर्धन विभागाची सर्वे नंबर 20 येथील 15 एकर जागेची परस्पर विक्री कोट्यावधी रुपयात करण्यात आली आहे. हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीने जानेवारी 2025 मध्ये या जागेची विक्री परस्पर केली आहे.

पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून य जागेची विक्री करण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क विभागाकडून याबाबतची माहिती जेव्हा पशुसंवर्धन विभागाला कळविण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी या विषयाची तक्रार पुण्याचे विभागीय आयुक्ताकडे केली आहे. आता या प्रकरणात पुण्याचे विभागीय आयुक्त आणि पशुसंवर्धन विभागाकडून चौकशी सुरू आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरातील कोट्यावधी रुपयाची शासकीय मोक्यची जागा या निमित्ताने लाटण्याचा प्रकार पुन्हा एकदा  उघडकीस आला आहे.  आता या प्रकरणाबाबत तपास सुरू आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मोठं शासकीय जमीन घोटाळा प्रकरण समोर आलं आहे. ताथवडे येथील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीने जानेवारी 2025 मध्ये या जागेची स्परस्पर विक्री केली आहे, त्यामुळे आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार हे पहाणं महत्त्वांच ठरणार आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...