AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरातचे काही खरे नाही! राहत्या घरावर थेट… नेमकं काय झालं?

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या अशोक खरातचा पाय आणखी खोलात असल्याचे दिसत आहे.

अशोक खरातचे काही खरे नाही! राहत्या घरावर थेट... नेमकं काय झालं?
अशोक खरातImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 13, 2026 | 2:42 PM
Share

लोकांची फसवणुक करणे, महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपये उकळल्याच्या आरोपांखाली नाशिकमधील अशोक खरातला अटक करण्यात आली. अशोक खरात विरोधात जवळपास 15 तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. सध्या त्याची SIT चौकशी सुरु आहे. तपासादरम्यान दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता खरातच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. थेट आयकर विभागाने खरातच्या घरावर धाड टाकली आहे.

आज, नाशिकमध्ये एकाचवेळी ११ ठिकाणी ईडीने केलेल्या छापेमारीने हे स्पष्ट झाले आहे की, हे प्रकरण केवळ एका ‘बाबा’पुरता मर्यादित नाही, तर यामागे एक मोठे नेटवर्क असू शकते. सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे, चौकशीदरम्यान अशोक खरात वारंवार फिरवाफिरवीची आणि विचित्र उत्तर देत तपास यंत्रणांना उकसवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की, तो सत्य लपवत आहे की खरोखरच यामागे काही मोठे राज दडलेले आहे?

ईडीच्या कारवाईने प्रकरण आर्थिक गुन्ह्याच्या कक्षेत

ईडीच्या या कारवाईने प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. खरातचे घर, ऑफिस, फार्महाउस आणि ईशान्यश्वर मंदिर या सर्व ठिकाणी छापे टाकण्यात आले. तपास यंत्रणांना आशा आहे की, येथून महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे मिळतील. ही छापेमारी सूचित करते की, प्रकरण आता मोठ्या आर्थिक घोटाळ्याकडे वळत आहे आणि पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

सध्या अशोक खरातची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची खरात योग्य पद्धतीने माहिती देत नसल्याचे चित्र आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार आहे. ती कुठे आहे असा प्रश्न विचारला असता, खरातने “ते देवालाच माहीत” असे म्हणत हात झटकले. मात्र, आपल्या लाडक्या मुलगा हर्षवर्धनसाठी तो अतिशय व्याकुळ झाला आहे. “माझ्या मुलाची मला खूप काळजी वाटते, मला त्याच्याशी एकदा तरी फोनवर बोलू द्या,” अशी विनंती तो पोलिसांकडे सतत करत आहे.

दरम्यान, भोंदू अशोक खरातला आज (१३ एप्रिल) पुन्हा नाशिक कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला कोर्टात आणले जाईल. तिसऱ्या गुन्ह्यात त्याला कोठडी देण्यात आली होती, तर चौथ्या गुन्ह्यात पुन्हा कोठडी मिळवण्यासाठी SIT प्रयत्न करणार आहे. सध्या SIT कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाचा तपशील तपास यंत्रणा आज कोर्टात सादर करणार आहे. अशोक खरातला आज ऑनलाइन पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे समजते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...