AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: खरातला मदत करणाऱ्या एजंट्सना धडा शिकवणार; SIT च्या रडारवर कोण कोण?

फक्त महिलांचं लैंगिक शोषणच नव्हे तर जमीन खरेदी-विक्री व्यवहारातही अशोक खरातने अनेकांची फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी आता जमीन खरेदी-व्रिकीचा व्यवहार करणारे एजंट्ससुद्धा एसआयटीच्या रडारवर आहेत.

Ashok Kharat: खरातला मदत करणाऱ्या एजंट्सना धडा शिकवणार; SIT च्या रडारवर कोण कोण?
अशोक खरातImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 05, 2026 | 10:37 AM
Share

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकरत आहे, तसतशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातने कोणाकोणाला आणि कशाप्रकारे फसवलं, याची माहिती आता बाहेर येऊ लागली आहे. तसंच लाखोंची जमीन खरातने कवडीमोल भावामध्ये नावावर करून घेतल्याच्याही घटना उघडकीस येत आहेत. आता खरातच्या जमीन खरेदी-विक्रीचे एजंटसुद्धा विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) रडारवर आहेत. याप्रकरणी आता जमीन खरेदी-विक्री एजंट्सचीही चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. इतकंच नव्हे तर नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारीदेखील एसआयटीच्या रडारवर आहेत.

एजंट्सचीही होणार चौकशी

तब्बल 60 लाख रुपयांची जमीन 22 लाख रुपयांना बळकावल्याच्या गुन्ह्यात अशोक खरातसोबत फिर्यादीची ओळख एजंटच्या माध्यमातून झाल्याची माहिती समोर आली आहे. खरातचे आर्थिक व्यवहार तपासले असता काही एजंटदेखील जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. जमीन व्यवहारात अनेक ब्रोकर तसंच शासनातील अधिकारी अशोक खरातला मदत करत होते का, असा संशय यावरून व्यक्त होत आहे.

एसआयटीच्या रडारवर कोण कोण?

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीकडून केला जात आहे. खरातने किती जणांना फसवलं, किती महिलांवर अत्याचार केले, याची माहिती एसआयटीच्या तपासात उघड होत आहे. एसआयटीला खरातकडून अजून बरीच माहिती जाणून घ्यायची आहे. त्याच्या फसवणुकीचे अनेक प्रकार बाहेर येत आहेत. खरातने फसविण्यासाठी अवलंबलेल्या पद्धतीमुळे तपास अधिकारीही थक्क झाले आहेत. जमीन व्यवहारांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आता अधिकारी एजंट्स आणि महसूल अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार असल्याचं कळतंय.

खरातला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणारा कोणीही असला तरी त्याला धडा शिकवणारच अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. त्यानुसार ही चौकशी करण्यात येणार आहे. खरात प्रकरणासंदर्भात ज्या ज्या व्यक्तीच्या विरोधात पुरावा मिळेल, त्याचा कोणा कोणासोबत संपर्क, व्यवहार होता, त्याला कोण कोण मदत करीत होते, याची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली होती.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!