AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरात प्रकरणाला नवं वळण, रोहित पवारांकडून मोठा पॉलिटिकल गेम उघड, म्हणाले दुसरी व्यक्ती अधिक वजनदार…

रोहित पवार यांनी ट्वीट करत अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावरून 'पॉलिटिकल गेम'चा आरोप केला असून एका वजनदार नेत्याकडे बोट दाखवले आहे.

अशोक खरात प्रकरणाला नवं वळण, रोहित पवारांकडून मोठा पॉलिटिकल गेम उघड, म्हणाले दुसरी व्यक्ती अधिक वजनदार...
rupali chakankar
| Updated on: Jun 05, 2026 | 10:42 AM
Share

नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारणात खळबळ उडाली होती. याप्रकरणी आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. त्यामुळे राजकारण कमालीचे तापले आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून (SIT) ६ तास कसून चौकशी करण्यात आली. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक ट्वीट करत महायुती सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. या प्रकरणात केवळ चाकणकर यांनाच टार्गेट केले जात असून, मुख्य राजकीय सूत्रधार अद्याप नामानिराळे असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे.

रोहित पवार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका ट्रॅव्हल कंपनीच्या काही डिटेल्स पाहायला मिळत आहे. यात अशोक खरात, रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि सुनील तटकरे अशी नाव पाहायला मिळत असून त्यावर काही तारखा आणि रक्कमेचा उल्लेख मिळत आहे. यासोबतच रोहित पवारांनी एक ट्वीटही केले आहे.

रोहित पवारांचे ट्वीट

सत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध असूनही आतापर्यंत त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आलं.. टार्गेट केलेल्या या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असूनही ते मात्र खरात प्रकरणातून नामानिराळे आहेत आणि आता तर खासदारकी आणि मंत्री पदापाठोपाठ विधान परिषदेची आमदारकीही स्वतःच्याच घरात ठेवली. माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली तर दुसऱ्याच्या घरात मात्र आधीच दोन-दोन पदं असताना आता तिसरंही आलं.. हा आहे महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम…!, असे रोहित पवार म्हणाले.

खरा सूत्रधार स्वतःला वाचवतोय, रोहित पवारांचा आरोप

दरम्यान भोंदूबाबा अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर यांच्या पाद्यपूजेचे व्हिडीओ आणि ‘शिवनिका ट्रस्ट’मधील त्यांचे कथित आर्थिक संबंध समोर आल्यानंतर त्यांना महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, रोहित पवारांच्या दाव्यानुसार हे प्रकरण केवळ भोंदूगिरीपुरते मर्यादित नसून यात कोट्यवधी रुपयांचे काळे धन आणि बड्या राजकीय नेत्यांचे लागेबांधे आहेत. अशोक खरातने अनेक नेत्यांच्या फोटोंवर फुली मारून जादूटोणा केल्याचा प्रकारही समोर आला आहे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याच्या आड सत्ताधारी पक्षातील खरा सूत्रधार स्वतःला वाचवत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…