AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

236 कॉल, 33 मेसेज आणि 152 खाती, चाकणकर भगिनींचा तामझाम पाहिल्यावर… सुषमा अंधारेंचे 6 तिखट प्रश्न

नाशिकमधील अशोक खरात फसवणूक प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होताच सुषमा अंधारेंनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चाकणकर भगिनींना मिळत असलेल्या रॉयल ट्रीटमेंटवर अंधारेंनी केलेला हा हल्लाबोल वाचा सविस्तर.

236 कॉल, 33 मेसेज आणि 152 खाती, चाकणकर भगिनींचा तामझाम पाहिल्यावर...  सुषमा अंधारेंचे 6 तिखट प्रश्न
ashok kharat pratibha chakankar
| Updated on: Apr 14, 2026 | 11:26 AM
Share

नाशिकमधील बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात फसवणूक आणि लैंगिक शोषण प्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. याच प्रकरणी काल शिर्डी पोलिसांनी रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांची सुमारे सहा तास प्रदीर्घ चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कधीही समता पतसंस्थेत खाते उघडलेले नाही किंवा तेथे गेलेले नाहीत. तसेच दिलेला पत्ताही चुकीचा आहे, असे प्रतिभा चाकणकरांनी म्हटले. आता यावरुन शिवेसना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.

सुषमा अंधारे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाही? पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते? असे अनेक सवाल केले आहेत.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

आम्ही एसआयटी ला भेटायला गेलो होतो एस आय टी या मुख्य इमारती पासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्या लगतपर्यंतचे सगळे गेट लॉक केले होते. पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पस मध्ये शिरकाव करू दिला नव्हता. मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डी मध्ये हे प्रिवीलेज का मिळाले? चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीय…

१. जर दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं फडणवीसांच म्हणणं आहे तर अजून पर्यंत दमानिया ला अटक का केली नाही?

२. दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी ?

३. पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते ?

४. स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियाने सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकर मध्ये 236 कॉल 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा enjoy period संपत का नाही?

५. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे ?

६. कोण कुणाला वेड्यात काढत आहे? चाकणकर एस आय टी ला ? दमानिया महाराष्ट्राला ? SIT पीडित महिलांना ?

कळसुत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे… !, असे ट्वीट सुषमा अंधारेंनी केले आहे.

प्रतिभा चाकणकरांचे स्पष्टीकरण

दरम्यान अशोक खरात याच्या आर्थिक गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती १०० हून अधिक बँक खात्यांची माहिती लागली आहे. यामध्ये प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांच्या नावे असलेल्या पतसंस्थेतील बँक खात्यांचाही समावेश आहे. प्राथमिक तपासात या खात्यांतून सुमारे २ कोटी रुपयांहून अधिक रकमेचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशोक खरातकडे गेल्यावर त्याने केवळ कागदपत्रे घेतली होती. आमच्या संमतीशिवाय आमच्या नावाचा आणि कागदपत्रांचा वापर करून त्याने ही बँक खाती उघडली आहेत,” असा दावा त्यांनी केला. आपण या आर्थिक व्यवहारांशी प्रत्यक्षरीत्या संबंधित नसल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी