AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्याही घरात स्त्री असल्याचं भान ठेवा… लिंगपिसाट खरातच्या त्या व्हिडिओची 15 ते 20 रूपयांना विक्री, सर्वच हादरले

नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड. लैंगिक अत्याचार संबंधित व्हायरल अश्लील व्हिडिओंची विक्री केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने आयटी ऍक्ट कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितांच्या गोपनीयतेचे उल्लंघन आणि आर्थिक वसुलीसाठी व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे सायबर प्रमुखांनी सांगितले.

आपल्याही घरात स्त्री असल्याचं भान ठेवा… लिंगपिसाट खरातच्या त्या व्हिडिओची 15 ते 20 रूपयांना विक्री, सर्वच हादरले
भोंदू अशोक खरात
| Updated on: Apr 08, 2026 | 10:07 AM
Share

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याने अनेक महिलांना फसवून, भुलवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणात तक्रार आल्यावर , त्याला 18 मार्च रोजी अटक करण्यात आली. त्याने नाशिकमधील त्याच्या कार्यालयात अनेक महिलांचं शोषण केलं, लैंगिक अत्याचर केला, एवढंच नव्हे तर तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे सगळं कैद झालं असून त्याचे अश्लीली व्हिडीओही व्हायरल झाले होते. याचप्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र सायबर सेलने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी अशोक खरात आणि पीडितांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. हा गुन्हा माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. ज्या चार वेगवेगळ्या सोशल मीडिया लिंक्सद्वारे हे व्हिडिओ प्रसारित केले जात होते, त्याविरोधात तपास यंत्रणेने गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू अशोक खरातशी संबंधित 15 ते 17 अश्लील व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि पॉर्न साईट्सवर व्हायरल करण्यात आले होते.

त्या व्हिडिओची 15 ते 20 रूपयांना विक्री

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, भोंदूबाबा अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची 15 ते 20 रुपयांना विक्री करण्यात आली. काही प्रकरणांमध्ये तर हे व्हिडिओ पाहण्यास इच्छुक असलेल्या लोकांकडून प्रति व्हिडिओसाठी 20 ते 50 रुपये आकारले जात होते, अशी माहिती देखील समोर आली आहे. पैसे भरल्यानंतर, ते व्हिडिओ इच्छित लोकांना पाठवले जात होते. मात्र या व्हिडिओंच्या प्रसारामुळे अनेक पीडितांची ओळखही उघड झाली असून, त्यांच्या गोपनीयतेवर गंभीर परिणाम झाला आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. याच प्रकरणी आता सायबर विभागा तर्फे दाखल गुन्हा करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सायबर प्रमुख यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास वेगाने सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं. अशोक खरात आणि इतर काही सोशल मीडिया अकाऊंट विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच या संदर्भात आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे

रुपाली चाकणकरांचे 177 कॉल्स

दरम्यान, बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याचं प्रकरण आता राजकीय वादाच्या केंद्रस्थानी येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून खरात यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सचे (सीडीआर) विश्लेषण केल्याचा दावा केला होता, त्या आधारे, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘सोयीचे राजकारण’ करत असल्याचा आरोप केला आहे.

दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, खरातने कोणत्या लोकांशी आणि किती वेळा संपर्क साधला हे समजून घेण्यासाठी त्यांनी ‘क्लाउड’ नावाच्या एआय-आधारित मोठ्या भाषिक मॉडेलचा वापर केला. मी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नाही, तर केवळ एआय टूलद्वारे एक्सेल डेटाची पडताळणी करून संबंधित माहिती अधिकाऱ्यांना दिली असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

अत्याचार प्रकरणी, 18 मार्चपासून तुरुंगात असलेल्या खरात याने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 17 वेळा संवाद साधला, तर रूपाली चाकणकर यांच्याशी 177 वेळा संपर्क साधण्यात आला. सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांसारख्या नेत्यांची नावेही समोर आली आहेत. दमानियांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ माजली होती.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?