AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Attempted attack on Sadavarte car : मोठी बातमी! जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

मोठी बातमी समोर येत आहे, जालन्यात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. सदावर्ते जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलकाच्या भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.

Attempted attack on Sadavarte car : मोठी बातमी! जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2025 | 2:59 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, जालन्यात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. सदावर्ते जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलकाच्या भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.

एसटीमधून आरक्षण मिळावं यासाठी जालन्यात धनगर बांधवांचं आंदोलन सुरू आहे, आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी आज गुणरत्न सदावर्ते हे जालन्यात दाखल झाले आहेत.  याचवेळी त्यांच्या वहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं जात आहे. असा हल्ला करुन मला कोणीही थांबवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 

मी आज डंके की चोट पर बोलणार आहे, धनगर बांधव एसटीमधून आरक्षण मिळावं यासाठी लढत आहेत. त्यांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो, मी जालन्याकडे येत असताना काही लोकांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. असा हल्ला करुन मला कोणीही थांबवू शकत नाही. आपण संविधानाला जोडलेलो आहोत. मी तुमच्या भेटीला आलो, तुमचं माझं रक्ताचं नातं आहे, म्हणून आलो. स्टंटबाजी करण्यासाठी आलो नाही, नाटक करण्यासाठी आलो नाही. मी संविधानाचं बोलतो म्हणून सरकार माझं ऐकतं, इंग्रजांच्या काळात जे समूह आदिवासी होते ते दुसरे तिसरे कोणी नसून धनगर आहेत, असा दावाही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

आरक्षणासाठी आंदोलन  

राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, सरकारने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदरबाद गॅझेट लागू केल्यानंतर बंजारा समाजाकडून देखील आमचा समावेश हा एसटीमधे करावा यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे जालन्यात देखील धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. आज गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यात येऊन धनगर समाजाच्या आंदोलकांची भेट घेतली, याचवेळी त्याच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी