संजय राऊत हे डोक्यावर पडले, त्यांना कोण सीरिअसली घेतं?; भाजप नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Mar 19, 2024 | 1:48 PM

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शहा यांच्या दिल्ली भेटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत अमित शाह यांच्यावर टीका केली होती. मात्र त्यांची ही टीका भाजप नेत्यांना फारशी रुचलेली नाही. संजय राऊत डोक्यावर पडले आहेत, त्यांना कोण सीरिअसली घेतं? असा सवाल विचारत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी हल्ला चढवला.

संजय राऊत हे डोक्यावर पडले, त्यांना कोण सीरिअसली घेतं?; भाजप नेत्याचा हल्लाबोल
Follow us on

मुंबई | 19 मार्च 2024 : “ राज ठाकरे महायुतीमध्ये गेल्याने काही फरक पडत नाही. महाराष्ट्र, मुंबईतील जनता सूज्ञ आहे. आमच्या मतांचं विभाजन करण्यासाठी शहांचे असे कितीही मनसुबे असले तरी महाराष्ट्रातील जनता हे मनसुबे हाणून पाडेल. सहन करणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शहा यांच्या दिल्ली भेटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत अमित शाह यांच्यावर टीका केली होती. मात्र त्यांची ही टीका भाजप नेत्यांना फारशी रुचलेली नाही. संजय राऊत डोक्यावर पडले आहेत, त्यांना कोण सीरिअसली घेतं? असा सवाल विचारत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

माध्यमांशी बोलताना भातखळकर यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. आमच्या मतांचं विभाजन करण्यासाठी असे शहांचे कितीही मनसुबे असले तरी महाराष्ट्रातील जनता हे मनसुबे हाणून पाडेल. सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. त्या संदर्भात बोलताना भातखळकर यांनी राऊत यांच्या विधानाच समाचार घेतला. ‘ राऊतांना म्हणो आधी महाभकास आघाडीच्या जागावाटपाचं काय ते बघा. वंचितसोबत काही होतंय का ते बघा. राऊत हे डोक्यावर पडलेले गृहस्थ आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानांना कोणीही गांभीर्याने घेत नाहीये. असं सांगत यंदा महाराष्ट्रात महायुतीच्या 45 पेक्षा जास्ती जागा येतील, असा विश्वास बातखळकर यांनी व्यक्त केला.

राज ठाकरे महायुतीत आले तर स्वागतच आहे

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) भाजपाच्या नेतृत्वाखाली देशभरात, महाराष्ट्रात कार्यरत आहे. मा. नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान करण्याची भूमिका ज्य़ांची असेल त्या सर्वांचं आम्ही एनडीएमध्ये, महाराष्ट्रायत, महायुतीमध्ये स्वागत करतोय. राज ठाकरे यांनी तसा विचार केला असेल तर त्यांचं महायुतीमध्ये स्वागत आहे, अशी भूमिका भातखळकर यांनी मांडली.

45 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात आणि देशात 400 पार हे भाजपचं टार्गेट पूर्ण करण्याचं महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने ठरवलेलं आहे. मनसे हा पक्ष महायुतीमध्ये आला तर त्यांचं निश्चित स्वागत आहे. आणि त्याचा फायदा हा आगामी राजकारणामध्ये १०० टक्के होईल असा विश्वासही भातखळकर यांनी व्यक्त केला.