AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident| आयशर ट्रकचा भीषण अपघात, तिघे जागीच ठार, औरंगाबादच्या शिवराई फाट्यावरची घटना

परिसरातील नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातातील उर्वरीत जखमींवर आता पुढील उपचार सुरु आहे.

Accident| आयशर ट्रकचा भीषण अपघात, तिघे जागीच ठार, औरंगाबादच्या शिवराई फाट्यावरची घटना
औरंगाबादेत भीषण अपघातात तिघे ठार
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 9:28 AM
Share

औरंगाबादः जिल्ह्यात दोन आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात (Aurangabad accident) झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, वाहनांमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे या मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. अपघातातील (Road Accident) जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. यापैकी एक ट्रक लग्न समारंभावरून परतत होता. त्यामुळे त्यात अनेक प्रवासी होते, अशी माहिती मिळतेय. याच ट्रकमधील तिघे जण (Three dead) ठार झाले असून यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.

Aurangabad accident

लग्नावरून परतणाऱ्या ट्रकला अपघात

या अपघाताविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील शिवराई फाट्यावर भीषण अपघात झाला. दोन आयशर ट्रकमध्ये हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे गतीवर अचानक नियंत्रण मिळवणे अशक्य झाले आणि चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या मुळे दोन्ही ट्रक परस्परांवर धडकले. यापैकी एक ट्रक लग्न समारंभावरून परतत होता. त्यामुळे त्यात अनेक प्रवासी होते, अशी माहिती मिळतेय. याच ट्रकमधील तिघे जण ठार झाले असून यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.

जखमींवर उपचार सुरु

दरम्यान, शिवराई फाट्यावर झालेल्या या भीषण अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार कळवण्यात आला. परिसरातील नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातातील उर्वरीत जखमींवर आता पुढील उपचार सुरु आहे.

इतर बातम्या

Health Care : वर्क फ्रॉम होम करत आहात? आरोग्य बिघडलंय मग आहारामध्ये या खास पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी राहा!

मुलांचा फुटबॉल विहिरीच्या दिशेने गेला अन् बेपत्ता पोलीसाचा शोध लागला,औरंगाबादेत खळबळ!

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...