Aurangabad News: नव्या वर्षात गुंठेवारी महागणार, जानेवारीनंतर रेडिरेकनर दरात 10 टक्क्यांची वाढ होणार

| Updated on: Dec 26, 2021 | 7:00 AM

औरंगाबादेत दोन वर्षानंतर रेडिरेकनर दरात वाढ होत असल्याने जानेवारी महिन्यापासून गुंठेवारीच्या मालमत्ता नियमितीकरणाचे दरही वाढतील.

Aurangabad News: नव्या वर्षात गुंठेवारी महागणार, जानेवारीनंतर रेडिरेकनर दरात 10 टक्क्यांची वाढ होणार
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः महापालिकेतर्फे मागील सहा महिन्यापासून शहरातील गुंठेवारीच्या मालमत्तांचे (Aurangabad Gunthewari) नियमितीकरण सुरु आहे. शहरातील नागरिकांचा या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. आतापर्यंत मालमत्ता नियमितीकरणासाठी (Property regularization) महापालिकेकडे साडे तीन लाख संचिका दाखल करण्यात आल्या आहेत. नवीन वर्षात मात्र गुंठेवारी मालमत्ता नियमितीकरणाची प्रक्रिया महाग होणार आहे. सध्या महापालिकेने तयार केलेल्या शुल्क रचनेनुसार गुंठेवारी नियमितीकरणासाठी चलन भरावे लागत असले तरी नवीन वर्षात बेटरमेंट चार्जेसमध्ये होणारी 10 टक्के वाढ तसेच रेडीरेकनर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमितीकरणासाठी मालमत्ताधारकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

रेडिरेकनरचे दर दोन वर्षापासून जैसे थे!

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून रेडिरेकनरचे दर जैसे थे आहेत. मात्र पुढील वर्षापासून हे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. वाढीव रकमेला गृहित धरले तर नियमितीकरणासाठी मालमत्ताधारकांना नवीन वर्षात विकासनिधी वाढीव रेडिरेकनरदरानुसार भरावा लागणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात गुंठेवारी नियमितीकरण करण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या बांधकामासाठी नियमितीकरण

राज्य सरकारने गुंठेवारी भागातील मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुधारीत आदेशानुसार, 31 डिसेंबर 2020 पर्यंत झालेली बांधकामे नियमित होणार आहे. यात नियमितीकरणाचे शुल्क पालिकेने स्वतःच्या स्तरावर ठरवावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार, महानगरपालिकेने शुल्क रचना केली असून 600 चौरस फुटांपर्यंतचे निवासी बांधकाम रेडिरेकनर दराच्या पन्नास टक्के शुल्क आकारून नियमित करण्यात येणार आहे. नियमितीकरण करताना मालमत्ताधारकांच्या जागेनुसार बेटरमेंट चार्जेस आकारले जातात. सध्या 1140 रुपये प्रति चौरस मीटर यानुसार दर आकारण्यात येतात. या दरात दरवर्षी वाढ होत असते. मात्र मागील दोन वर्षे त्यात वाढ करण्यात आलेली नव्हती.

इतर बातम्या-

दिल्ली गाजवली, आता पंजाबचं रणमैदानही गाजवणार?, 22 शेतकरी संघटना लढवणार निवडणूक, मुख्यमंत्रीपदाचा चेहराही जाहीर; डोकेदुखी कुणाला

लसीचे दोन डोस घ्या, नाही तर कारवाई करू; केडीएमसीचा दुकानदार, व्यापाऱ्यांना ‘डोस’