Aurangabad | छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त क्रांती चौकात उत्सव, वाहतुकीत काय बदल?

| Updated on: Mar 21, 2022 | 1:15 PM

सोमवारी सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत येथील क्रांती चौक परिसरातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. यादरम्यान, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Aurangabad | छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त क्रांती चौकात उत्सव, वाहतुकीत काय बदल?
औरंगाबाद क्रांती चौक येथील शिवाजी महाराजांचे नवे शिल्प
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

औरंगाबादः छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Shivaji Maharaj Jayanti) काही संघटना आणि पक्षांकडून तिथीनुसार साजरी करण्यात येते. यावेळी ही तिथी 21 मार्च रोजी असून औरंगाबादमध्ये (Aurangabad city) आज यानिमित्त मोठा उत्सव साजरा केला जाणार आहे. औरंगाबादमध्ये नुकताच देशातील सर्वात उंच शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या शिवस्मारकाजवळ शिवप्रेमींची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने वाहतुकीत (Change in Traffic rout) काही बदल सूचवले आहेत. त्यानुसार, सोमवारी सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत येथील क्रांती चौक परिसरातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. यादरम्यान, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतुकीच्या मार्गात काय आहेत बदल?

  • अमरप्रीत चौक ते बाबा पेट्रोलपंप चौक (महावीर चौक), सिल्लेखाना ते क्रांती चौक, गोपाल टी ते क्रांती चौक रस्ता सर्व वाहनांसाठी बंद राहील.
  • जालन्याच्या दिशेने जाणारी वाहने बाबा पेट्रोल पंप, रेल्वेस्टेशन चौक, बीड बायपासमार्गे किंवा कार्तिकी चौक, मिलकॉर्नर, अण्णा भाऊ साठे चौकमार्गे जळगाव रस्त्याकडे जातील.
  • जालन्यातून अहमदनगरकडे जाणारी वाहने अमरप्रीत चौक, दर्गा चौक, बीड बायपास मार्गे किंवा खोकडपुरा, सिल्लेखाना, सावरकर चौक, कार्तिकी चौक, बाबा पेट्रोल पंपाकडे जातील.
  • आकाशवाणी, मोंढ्याकडे जाण्यासाठी गोपाल टी-संत एकनाथ रंगमंदिर, काल्डा कॉर्नर, अमरप्रीत चौक ते मोंढा अशा रस्त्याचा वापर करावा, असे वाहतूक पोलिसांच्या वतीने कळवण्यात आले आहे.

मनसेतर्फे शिवचरित्रावर व्याख्यान

आज शिवजयंतीनिमित्त शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे श्रीनिवास श्रीधरराव कानिटकर यांचे शिवचरित्राचे महत्त्व या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले आहे. शहरातील कलश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच मनसेतर्फे अनाथ मुलांना पावनखिंड हा चित्रपटदेखील दाखवण्यात येणार आहे.

इतर बातम्या-

IPL 2022: ना धोनी, ना विराट-रोहित… हा भारतीय खेळाडू श्रेयस अय्यरचा आवडता कर्णधार, कारण ऐकून तुम्हीही हसाल

Photo Gallery : जुनं तेच सोनं, दर वाढीनंतरही राजस्थानी माठची नंदूरबारकरांना भुरळ