AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: ठाकरे स्मारकाच्या कामाची स्वतंत्र पाहणी करा, कोर्टाचे आदेश, प्रस्तावित नकाशा अव्यवहार्य असल्याचे निरीक्षण!

औरंगाबादः शहराचे ‘ग्रीन लंग्स’ अर्थात शहराचे फुप्फुस समजल्या जाणाऱ्या प्रियदर्शिनी (Priyadarshini Garden, Aurangabad) उद्यानातील वृक्षतोडीच्या आरोप प्रकरणी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. एमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी (Aurangabad Priyadarshini Garden) उद्यानातील प्रस्तावित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची दोन दिवसात पाहणी करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने  दिले आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) तसेच वकिलांच्या त्रिसदस्यीय समितीने स्वतंत्ररित्या […]

Aurangabad: ठाकरे स्मारकाच्या कामाची स्वतंत्र पाहणी करा, कोर्टाचे आदेश, प्रस्तावित नकाशा अव्यवहार्य असल्याचे निरीक्षण!
औरंगाबादमधील प्रियदर्शनी उद्यानात प्रस्ताविक प्रकल्पासाठी मनपा वृक्षतोड करत असल्याचा आरोप
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 30, 2021 | 12:29 PM
Share

औरंगाबादः शहराचे ‘ग्रीन लंग्स’ अर्थात शहराचे फुप्फुस समजल्या जाणाऱ्या प्रियदर्शिनी (Priyadarshini Garden, Aurangabad) उद्यानातील वृक्षतोडीच्या आरोप प्रकरणी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. एमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी (Aurangabad Priyadarshini Garden) उद्यानातील प्रस्तावित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची दोन दिवसात पाहणी करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने  दिले आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) तसेच वकिलांच्या त्रिसदस्यीय समितीने स्वतंत्ररित्या भेट देऊन पाहणी करून दोन दिवसात अहवाल सादर करावा तसेच विकासकामे जैसे थे ठेवावीत, असे आदेश खंडपीठातील न्यायमूर्ती रवींद्र घुदे, एस.जी. मेहरे यांनी दिले. स्मारकाच्या परिसराचा वास्तुविशारदाने तयार केलेला नकाशा प्रथमदर्शनी अव्यवहार्य वाटत असल्याचे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले.

नेमकी याचिका काय?

सिडकोतील प्रियदर्शनी उद्यान 2016 मध्ये सिडको प्रशासनाने महापालिकेकडे हस्तांतरीत केले. महापालिकेने उद्यानातील झाडे तोडून वृक्षांचे पुनर्रोपणही केले नाही. तेथे स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक बनवण्याचा निर्णय झाल्यानंतर 2019 मध्ये योगेश बाळसाखरे व सोमनाथ कराळे यांनी अॅड. सनी खिवंसरा यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली होती. शहरातील ऑक्सिजनची गरज प्रियदर्शनी उद्यानामुळे पूर्ण होत असल्याचे याचिकेत म्हटले होते. महापालिकेने या उद्यानात नव्याने 10 कोटी निधीची तरतूद करून स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, म्युझियम, फूड कोर्ट आणि अँफी थिएटर उभारणीस प्रारंभ केला होता. खंडपीठाने जनसहयोग संस्थेमार्फत अहवाल मागवून बांधकामासंबंध ‘जैसे थे’ चे आदेश दिले होते.

शहरातला महत्त्वाचा ग्रीन झोन

इंटरनॅशनल सर्व्हे ऑफ इन्व्हायर्नमेंट संस्थेच्या सर्वेक्षणात उद्यान व परिसरात शहरातील इतर भागांच्या तुलनेत सर्वात कमी प्रदूषण असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र मनपाने उद्यानात नव्याने दहा कोटींचा निधी प्रस्तावित करून ठाकरे स्मारक, म्युझियम, फूड कोर्ट व एएमसी थिएटर उभारणीस प्रारंभ केला आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी पुन्हा खंडपीठात धाव घेत बांधकामाची छायाचित्रे निदर्शनास आणून दिली. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असून इतरत्र त्याचे पुनर्रोपणही केले जात नाही, असे आक्षेप नोंदवले.

इतर बातम्या-

परमबीर-वाझे भेटीची चौकशी होणार, एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही, वळसे-पाटील यांची माहिती

प्रतिस्पर्धी टोळीशी हातमिळवणीचा संशय, नागपुरात कुख्यात गुंडाकडून मेकॅनिकची हत्या

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला