AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परमबीर-वाझे भेटीची चौकशी होणार, एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही, वळसे-पाटील यांची माहिती

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीची चौकशी करण्यात येणार आहे. एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही.

परमबीर-वाझे भेटीची चौकशी होणार, एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही, वळसे-पाटील यांची माहिती
दिलीप वळसे-पाटील
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Nov 30, 2021 | 12:05 PM
Share

मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) हे चांदीवाल कमिशनसमोर (Chandiwal Commission) चौकशीला जाण्यापूर्वी भेटल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मंगळवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( Dilip Walse-Patil) यांनी दिली. एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

नेमके काय प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळतेय, हे नियमाला धरून नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत, अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली होती.

चौकशीला बाधा

परमबीरसिंह व सचिन वाझे हे दोघेही अनेक प्रकरणात आरोपी आहेत. आणि अशा पद्धीतीने दोन आरोपीमध्ये चर्चा होणे गंभीर आहे, यामुळे चौकशीमध्ये बाधा पोहचू शकते. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना कधी घडली नाही. जर असे झाले असेल तर याची खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यामध्ये काय चर्चा झाली? त्यांच्या भेटीमागे कोण आहे ? त्यात काय कट शिजला? हे जनतेच्यासमोर आलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली होती.

सरकारी गाडी वापरणे गैर

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीवर दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही. मात्र, ही भेट कशी झाली याची चौकशी केली जाईल. या प्रकरणात आरोपी बाहेर कुणाशी चर्चा करू शकत नाही. त्यातही परमबीर यांनी सरकारी गाडी वापरणे चुकीचे आहे. त्यांनी अजून पदभार घेतलेला नाही. त्यांच्या निलंबनाबाबत‌ कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. नियमाने त्यांच्यावर निर्णय घेतला जातो. मात्र, त्यापूर्वीच अशा भेटीगाठी घेणे योग्य नसल्याचेही पाटील म्हणाले.

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीची चौकशी करण्यात येणार आहे. एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही. त्यातही परमबीर यांच्या निलंबनाबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. – दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री

इतर बातम्याः

VIDEO: दोन लग्न आणि एका साखरपुड्याची गोष्ट! राऊत, ठाकूर, पाटलांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर; पाहा, विवाह सोहळ्यांचा थाटमाट

कुख्यात गँगस्टर अमित भोगलेला बेड्या, दोन देशी पिस्तूल, 8 जिवंत काडतुसे, शस्त्र जप्त, मुंबई पोलिसांची कारवाई!

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...