AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Jobs: ग्रीव्हज कॉटन कंपनी औरंगाबादेत उभारणार इंजिन निर्मितीचे हब, शहरात रोजगार वाढीची संधी

चिकलठाणा व शेंद्रा एमआयडीसी येथील आधीच्या प्रकल्पांत एकूण 2000 जणांना रोजगार मिळाला आहे. कंपनीचा औरंगाबादेत नवीन प्रकल्प उभा राहिल्यावर रोजगारात आणखी वाढ होईल.

Aurangabad Jobs: ग्रीव्हज कॉटन कंपनी औरंगाबादेत उभारणार इंजिन निर्मितीचे हब, शहरात रोजगार वाढीची संधी
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 11, 2021 | 10:44 AM
Share

औरंगाबाद: ई- व्हेईकलमध्ये आघाडीचे नाव असलेली ग्रीव्हज कॉटन लिमिटेड (Greaves Cotton Limited ) ही कंपनी लवकरच इंजिन निर्मितीचा प्रकल्प औरंगाबादमध्ये विस्तारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंपनीचे चिकलठाण्यात (Chikalthana MIDC, Aurangabad) दोन आणि शेंद्रा एमआयडीसीमध्ये आधीपासूनच एक प्रकल्प आहे. त्याअंतर्गत अनेकांना रोजगार मिळालेला आहे. आतचा नवीन प्रकल्प सुरु झाल्यावर औरंगाबादमधील नागरिकांना नोकरी आणि रोजगारात आणखी वृद्धी होण्याचे संकेत आहे.

ग्रीव्हज कॉटन कंपनी कशाचे उत्पादन करते?

1859 मध्ये स्थापन झालेल्या ग्रीव्हज कॉटन कंपनीचे मुख्यालय मुबई येथे आहे. जेम्स ग्रीव्हज आणि जॉर्ज कॉटन यांनी सुरु केलेली ही कंपनी वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल इंजिन (ऑटोमोटिव्ह इंजिन), जेनसेट, पंपसेट तसेच शेती व बांधकामासाठी लागणारी उपकरणे तयार करते. या कंपनीचे पुणे, औरंगाबाद, नोयडा, कोइम्बतूर व चेन्नईच्या रानीपेट येथे प्रकल्प आहे. औरंगाबादच्या चिकलठाणा व शेंद्रा एमआयडीसीतील प्रकल्पात ऑटोमोटिव्ह इंजिनची निर्मिती होते. मोबिलिटी सेगमेंटमध्ये ही कंपनी दरवर्षी 4 लाखांपेक्षा जास्त इंजिन तयार करते. कंपनीच्या प्रकल्पाअंतर्गत प्रतिमिनिट एक इंजिन तयार होते. भारतातील बहुसंख्य लोकांना TCO मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करते. यातून दररोज एक कोटीपेक्षा अधिक प्रवासी व 5 लाख टन मालाची वाहतूक केली जाते.

अँपियर इलेक्ट्रिक अंतर्गत औरंगाबादचा विस्तार

सध्या कंपनीने इलेक्ट्रिक व्हेइकलच्या निर्मितीत विशेष लक्ष घातले असून त्यासाठी ‘अँपियर इलेक्ट्रिक’ ही उपकंपनी सुरु केली आहे. या कंपनीनेच ई-स्कूटर बाजारात आणल्या आहेत. ई व्हेईकल निर्मितीचा प्रकल्प तमिळनाडूतील रानीपेट येथे सुरु केला जाणार आहे. त्या प्रकल्पाकरिता तसेच इतर शहरातील इंजिन निर्मिती प्रकल्प औरंगाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कंपनीचे शहरात आधीच तीन प्रकल्प

ग्रीव्हज कॉटन लिमिटेड कंपनीचे चिकलठाणा एमआयडीसीत 30 एकर जागेवर 2 प्लांट आणि एक संशोधन व विकास प्रकल्प आहे. शेंद्रा एमआयडीसीत 17 एकरवर एक प्लांट आणि एक संशोधन प्रकल्प आहे. दोन्ही प्रकल्पांत मिळून 2000 जणांना रोजगार मिळाला आहे. कंपनीचा औरंगाबादेत नवीन प्रकल्प उभा राहिल्यावर रोजगारात आणखी वाढ होईल. जास्तीत जास्त स्थानिक मनुष्यबळाला संधी दिली जाईल. (Greaves Cotton Limited will start new plant in Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या- 

Bank Jobs 2021: साऊथ इंडियन बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदावर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेत नोकऱ्यांची अमाप संधी, भारतात 10 हजार तंत्रज्ञांची गरज, 75 लाखांपर्यंतची सॅलरी पॅकेजेस

Follow Us
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....