Bank Jobs 2021: साऊथ इंडियन बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदावर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

साऊथ इंडियन बँकेने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवार साऊथ इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट southindianbank.com ला भेट देऊन अर्ज सादर करु शकतात.

Bank Jobs 2021:  साऊथ इंडियन बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदावर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 4:07 PM

नवी दिल्ली: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. साऊथ इंडियन बँकेने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवार साऊथ इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट southindianbank.com ला भेट देऊन अर्ज सादर करु शकतात.

साऊथ इंडियन बँकेत पीओ पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतील नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी केवळ आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी बँकेची अधिकृत वेबसाइट southindianbank.com ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा. मात्र, परीक्षा आणि प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

अर्ज कसा करावा

स्टेप 1: सर्वप्रथम साऊथ इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट southindianbank.com ला भेट द्या. स्टेप 2: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर दिलेल्या CAREERS वर क्लिक करा. स्टेप 3: पुढेEMPLOYEEE DEVELOPMENT आणि CAREER GROWTH वर क्लिक करा. स्टेप 4: साऊथ इंडियन बँक एसआयबी प्रोबेशनरी ऑफिसर पीओ भर्ती 2021 च्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 5: संपूर्ण अर्ज भरुन माहिती सादर करा स्टेप 6: अर्ज पूर्ण केल्यानंतर, फॉर्मची प्रिंट आउट घ्या.

पात्रता

बँकेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंतची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवी परीक्षेला 50% गुण असणे अनिवार्य आहे. तसेच 2 वर्षांचा अनुभव देखील असावा. उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा कमी असावे. 31 जुलै 2021 रोजीचं वय मोजलं जाणार आहे.

अर्जाचं शुल्क

साऊथ इंडियन बँकेने जारी केलेल्या भरती प्रक्रियेअतंर्गत अर्ज करणाऱ्या खुल्या, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800 रुपये अर्ज शुल्क निश्चित केले आहे. एससी-एसटी आणि दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांना 800 रुपये अर्जाचं शुल्क जमा करावे लागेल. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने फी भरता येते. अधिक माहितीसाठी उमदेवारांनी बँकेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय.

इतर बातम्या:

NABARD Admit Card 2021: नाबार्डकडून सहायक व्यवस्थापक आणि मॅनेजर परीक्षेचं प्रवेशपत्र जारी, डाऊनलोड कसं करायचं?

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 प्रशासकीय अधिकारीपदांसाठी भरती, 21 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

Bank Job 2021: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये SO पदासाठी भरती, अर्ज कसा कराल?

South Indian Bank Application Started for PO Post know how to Apply and check details

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.