AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Job 2021: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये SO पदासाठी भरती, अर्ज कसा कराल?

बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, विशेष अधिकारी पदासाठी या रिक्त जागेत (Bank of Maharashtra Recruitment 2021) एकूण 190 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया 19 सप्टेंबर 2021 पर्यंत चालणार आहे.

Bank Job 2021: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये SO पदासाठी भरती, अर्ज कसा कराल?
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 7:16 PM
Share

नवी दिल्लीः Bank Job 2021: ज्या उमेदवारांना बँकेत नोकरी हवीय, त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र तज्ज्ञ अधिकारीपदासाठी भरती करीत आहे. यामध्ये अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू होत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) – bankofmaharashtra.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, विशेष अधिकारी पदासाठी या रिक्त जागेत (Bank of Maharashtra Recruitment 2021) एकूण 190 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया 19 सप्टेंबर 2021 पर्यंत चालणार आहे. अर्ज शुल्क जमा करण्याची ही शेवटची तारीख आहे. मात्र, परीक्षा आणि प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या पदांवर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध अधिसूचना तपासणे आवश्यक आहे.

याप्रमाणे अर्ज करा

?रिक्त पदावर अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट bankofmaharashtra.in वर जा. ?वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर दिलेल्या भरतीवर क्लिक करा. ?आता BOM मधील करिअरवर जा. ?येथे स्केल I आणि II मधील विशेषज्ञ ऑफिसर्सच्या रिक्रूटमेंटच्या लिंकवर क्लिक करा. ?आता विनंती केलेले तपशील भरून नोंदणी करा. ?नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता. ?थेट लिंक स्वच्छ करण्यासाठी येथे क्लिक करा.

रिक्त पदाचा तपशील जाणून घ्या

बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 190 जागा रिक्त असतील. कृषी क्षेत्र अधिकारी 100 पदांसाठी भरती होईल. या व्यतिरिक्त सुरक्षा अधिकाऱ्यासाठी 10, विधी अधिकारी 10, वैयक्तिक अधिकारी 10, विंडोज प्रशासकासाठी 12 यासह अनेक पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 93 जागा निश्चित करण्यात आल्यात. याशिवाय ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 18, ओबीसीसाठी 46, एससी श्रेणीसाठी 24 आणि एसटीसाठी 9 जागा निश्चित करण्यात आल्यात.

अर्ज फी काय असेल?

स्पेशालिस्ट ऑफिसर पदावर प्रसिद्ध झालेल्या या रिक्त जागेत अर्ज करणाऱ्या सामान्य ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1180 रुपये, तर एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 118 रुपये निश्चित करण्यात आलेय. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने फी भरता येते. रिक्त जागेच्या संपूर्ण तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना पाहा.

संबंधित बातम्या

6 लाख कोटींच्या विक्रीसाठी मोदी सरकारची यादी तयार, जाणून घ्या काय काय विकणार?

भारताच्या नवरत्न कंपन्या विकण्याची कोणतीही योजना नाही, सरकारचं विरोधकांना प्रत्युत्तर

Bank Job 2021: Recruitment for SO post in Bank of Maharashtra, how to apply?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.