AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उस्मानाबादेत खळ्ळ खट्याक! मुंबई- हैदराबाद रोडवरील फुलवाडी टोलनाका मनसे जिल्ह्याध्यक्षांनी फोडला

उस्मनाबादमध्ये मनसे जिल्हाध्यक्षांनी आज फुलवाडी येथील टोलनाका फोडला. येथील उड्डाणपुले, सर्व्हिस रोड, व्हिलेज रोड आदी सर्व कामे अर्धवट आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. आतापर्यंत येथे 1000 ते 1200 नागरिकांचे प्राणही गेले आहेत, असे असतानाही रस्ते दुरुस्त करण्याऐवजी सक्तीची टोल वसुली सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

उस्मानाबादेत खळ्ळ खट्याक! मुंबई- हैदराबाद रोडवरील फुलवाडी टोलनाका मनसे जिल्ह्याध्यक्षांनी फोडला
फुलवाडी टोलनाक्यावर मनसे नेते आक्रमक
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 03, 2021 | 3:03 PM
Share

उस्मनाबादः उस्मनाबाद जिल्ह्यातील तुळजापूर (Osmanabad Tuljapur) तालुक्यातील फुलवाडी टोलनाक्यावर आज मनसे(MNS) नेत्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मनसे जिल्हाध्यक्ष (Prashant Navgire)  आणि कार्यकर्त्यांनी हा टोलनाका फोडला. या महामार्गाचे काम अद्याप सुरु झाले नसून रस्त्यावरून जाणाऱ्या गरीब प्रवाशांकडून सक्तीने टोलवसुली केली जाते. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हजारो निरपराधांचा अपघातात जीव गेला असूनही कोणत्या अधिकाराखाली रस्ता बनवणारी कंपनी टोल वसूल करते, असा सवाल करत मनसेने या टोलनाक्याची नासधूस केली.

रस्त्याचे काम अर्धवट, तरीही टोल वसुली!

मनसेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी टोलनाका फोडण्याच्या आंदोलनात आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, नॅशनल हायवे क्रमांक 65 वरील हा सुमारे 100 किलोमीटरचा रस्ता प्रचंड खड्डेमय आहे. येथील उड्डाणपुले, सर्व्हिस रोड, व्हिलेज रोड आदी सर्व कामे अर्धवट आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. इथल्या दुभाजकांवर भले मोठे गवत वाढले आहे. यामुळे असंख्य प्रवाशांचे अपघात झाले आहेत. आतापर्यंत येथे 1000 ते 1200 नागरिकांचे प्राणही गेले आहेत, असे असतानाही रस्ते दुरुस्त करण्याऐवजी सक्तीची टोल वसुली सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

नवगिरे यांच्यावर गुन्हा दाखल

जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक, आदींकडे रस्ते बांधणाऱ्या कंपनीविरोधात अनेकदा तक्रार करूनही त्यांनी विनंतीला मान दिला नाही, असा आरोप नवगिरे यांनी केला. येथून जाणारे शेतकरी आणि नागरिकांना शिवीगाळ करून त्यांच्याकडून सक्तीने टोल वसूल केला जातो, याच कारणासाठी मनसेने हा धडा शिकवला, अशी प्रतिक्रिया नवगिरे यांनी यावेळी दिली. मात्र या हिंसक कृत्यानंतर नवगिरे यांच्यावर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

इतर बातम्या-

ST Strike: राज्यात आतापर्यंत 9 हजार एसटी कर्मचारी निलंबित, MESMA अंतर्गत कारवाई, काय आहे नेमका कायदा?

ममतांचा दूत म्हणून काम करून शिवसेनेने महाराष्ट्र द्रोह केला; भाजप नेते आशिष शेलारांची घणाघाती टीका

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!