ममतांचा दूत म्हणून काम करून शिवसेनेने महाराष्ट्र द्रोह केला; भाजप नेते आशिष शेलारांची घणाघाती टीका

शिवसेनेने आणि राजशिष्टाचार मंत्र्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पायघड्या टाकल्या. त्यांचा दूत म्हणून काम केले. त्यांनी त्यांच्यासाठी बैठका अॅरेंज केल्याचाही संशय आहे. हा महाराष्ट्र द्रोह आहे, अशी घणाघाती टीका गुरुवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.

ममतांचा दूत म्हणून काम करून शिवसेनेने महाराष्ट्र द्रोह केला; भाजप नेते आशिष शेलारांची घणाघाती टीका
आशिष शेलार, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 2:36 PM

मुंबईः शिवसेनेने आणि राजशिष्टाचार मंत्र्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पायघड्या टाकल्या. त्यांचा दूत म्हणून काम केले. त्यांनी त्यांच्यासाठी बैठका अॅरेंज केल्याचाही संशय आहे. हा महाराष्ट्र द्रोह आहे, अशी घणाघाती टीका गुरुवारी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. ते मुंबईत बोलत होते. शिवाय राज्य सरकार परमबीर सिंहांना वाचवत आहे, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही देशासमोर खोटे का बोलला, याचे उत्तर द्या. हे कायद्याचे राज्य आहे. कायद्याने चाला. तिन्ही पक्ष एकमेकाशी बोलत नाहीत. हेच यावरून दिसत आहे. राज्यातले मंत्री खोटं का बोलत होते, याचे उत्तर द्या, अशी मागणी त्यांनी केली.

राजशिष्टाचार ममतांसाठीच का?

आशिष शेलार यांनी मागील सात वर्षात ज्या पद्धतीने मोदी काम करत आहेत ते लोकांना मान्य आहे, असा दावा केला. सत्तेतले लोक त्यांचे दूत म्हणून काम करत असल्याचे दिसून येत आहे. जे पराभूत मनोवृत्तीचे आहेत, ते काय ठरवणार, असा सवाल त्यांनी केला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ममता बॅनर्जी ऐकत नाहीत. काँग्रेस आहे हे, ते मानत नाही. आणि शरद पवारांचे ऐकत नाहीत. यांचेच एकमेकांचे पाय एकमेकात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेलार पुढे म्हणाले की, शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह आता त्यांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे संजय राऊत पांघरूण घालायचे. हा राजशिष्टाचार ममतांसाठी आहे. तो इतरांसाठी का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सावरकरांचा अपमान का?

सावरकरांच्या वक्तव्याबद्दल प्रियांका चतुर्वेदी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. कुठलाही शिवसैनिक सावरकरांचा असा उल्लेख करणार नाही. शिवसैनिकांना हे सहन होणार नाही. जे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांना हा सावरकरांचा अपमान कधीच मान्य होणार नाही. हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या लोकांना तुम्ही भेटता, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. बाळासाहेबांचे शिवसैनिक यांना देखील प्रियंका चतुर्वेदी जे बोलल्या ते पसंत नाही. हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

इतर बातम्याः

Nashik Corona Update: नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या 467 रुग्णांवर उपचार सुरू; एकाचा मृत्यू, निफाडमध्ये सर्वाधिक 97 रुग्ण

फडणवीसांनी मिळवलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले, विनायक मेटेंचा हल्लाबोल

हायकोर्टाच्या सुनावणीपूर्वीच मॉडर्न कॅफे जमीनदोस्त; नाशिकमध्ये महापालिका आयुक्तांची वादग्रस्त कारवाई

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.