AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक कॉल आला… मला माफ करा, कुणालच्या मावशीने सांगितला अखेरचा संवाद; Khavdya Dongar प्रकरणात मोठी अपडेट

कुणाल चांदगुडेच्या मावशीने त्याच्या आत्महत्येमागील सत्य उघड केले. आई-वडिलांमधील वादामुळे कुणाल त्रस्त होता आणि वडिलांना परत आणू इच्छित होता. 'मला माफ करा', हा त्याचा शेवटचा कॉल होता. आयफोन नव्हे, तर कुटुंबातील कलह हेच मुख्य कारण असल्याचे मावशीने स्पष्ट केले.

अचानक कॉल आला... मला माफ करा, कुणालच्या मावशीने सांगितला अखेरचा संवाद; Khavdya Dongar प्रकरणात मोठी अपडेट
Kunal Chandgudes Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2026 | 5:18 PM
Share

आईवडिलांमधील वादामुळे कुणाल त्रस्त होता. वडिलांनी आपल्यासोबत राहावे असं त्याला वाटत होतं. पण वडील ऐकायला तयार नव्हते. मीही कुणालला अनेकदा समजावलं होतं. प्रत्येक कुटुंबात असे वाद होतच असतात. सर्व काही नीट होईल, असं त्याला सांगितलं होतं. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला फक्त आणि फक्त वडील हवे होते. तो जीवाचं असं काही करेल हे त्याने कुणालाच सांगितलं नव्हतं. पण अचानक त्याचा कॉल आला, मला माफ करा मी असं करत आहे, असं तो म्हणाला होता, असं कुणाल चांदगुडेच्या मावशी कल्याणी परडे यांनी सांगितलं. कुणालच्या शेवटच्या कॉलबाबत त्या बोलत होत्या. कुणालने आयफोनसाठी आत्महत्या केली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कुणाल चांदगुडेची मावशी कल्याणी परडे यांनी मीडियाशी संवाद साधताना चांदगुडे कुटुंबातील कलह आणि कुणालच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं. तो फक्त एक अपघात झाला. कारण त्याला पैशांची कमी नव्हती. त्याचे वडील त्याच्या सोबत राहत नव्हते. तरी त्या दोघांवर ते खूप प्रेम करत होते. तसेही कुणालला काही झालं असतं तर दाजीने जीव दिला असता एवढं त्यांचं प्रेम होतं. कुणालला झालेला त्रास दाजी कधीच पाहू शकत नव्हते, असं कल्याणी म्हणाल्या.

तेव्हा जीव द्यायला गेला नव्हता…

यापूर्वीही कुणाल आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर गेला होता, अशी चर्चा आहे. त्यावरही कल्याणी यांनी खुलासा केला. 2025 मध्ये तो आत्महत्यासाठी नव्हे तर फिरण्यासाठी तिथे गेला होता. तो काही कारणावरून तेव्हा दु:खी होता. मात्र, त्याने त्याच्या आईला मेसेज करून सांगितले होते की, मी संध्याकाळपर्यंत घरी येईल. मात्र दीदीने त्याचा मेसेज बघितला नाही आणि ती पोलीस ठाण्यात पोहोचली. रात्री 11 वाजता पोलिसांनी तो मेसेज बघितला. आपण अजूनही चिखलठाणा पोलीस ठाण्यात जाऊन विचारू शकता, असं त्यांनी स्पष्ट केलं.

त्याला फक्त भावनिक करायचं होतं

तेव्हा तो आत्महत्या करण्यासाठी गेला नव्हता तर अपसेट असल्यामुळे फिरायला गेला आणि संध्याकाळपर्यंत घरी येणार होता. आई मी थोडा परेशान आहे. मला थोडा स्वतंत्र वेळ हवा. मी संध्याकाळपर्यंत परत येतो, असे त्यांनी आईला मेसेजमध्ये सांगितले होते. तो घर लावून गेल्यामुळे माझी बहीण घाबरली होती. एकुलता एक मुलगा असल्याने तिचं घाबरणं स्वाभाविक होतं. म्हणून तिने पोलीस ठाणे गाठलं होतं. या वयामध्ये थोडा गैरसमज होतो. या वयात मुलं बदमाशपणा करतात. पण त्याला तेव्हा आत्महत्या करायची नव्हती. कदाचित यावेळेस देखील त्याला आत्महत्या करायची नव्हती. फक्त असे भावनिक करून त्याला आई-वडिलाला एकत्र आणायचे होते, असंही त्यांनी म्हटलंय.

म्हणून युट्यूबवर बोलायची

माझी दीदी म्हणजे संगीता चांदगुडे ही तिच्या सासरच्या मंडळीवर नाराज होती. त्याला काही कारणे होती. दाजी घर सोडून गेले आणि ते परत येत नव्हते. त्यामुळे ती परेशान होती. त्यांचे वाद वाढत चालले होते. त्यांच्यामध्ये कुठलाही संवाद नव्हता. त्यामुळे संगीता चांदगुडे यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम बनवलं होतं. तिचा तेवढा हक्क आहे, कारण 20 वर्षापासून ते सोबत होते. ज्या गोष्टी तिला योग्य वाटत नव्हत्या. त्यावर तिने बोलणं वाईट नाही, असंही कल्याणी यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ