AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : म्हणावं इतकं काम झालं नाही? भाजपासोबत बोलणी होतेय? राज ठाकरे म्हणाले…

भाजपा (BJP) किंवा इतर कोणाशी आघाडी करायची याविषयी मला काहीही सांगायचं नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केलंय. औरंगाबाद(Aurangabad)मध्ये ते बोलत होते.

Raj Thackeray : म्हणावं इतकं काम झालं नाही? भाजपासोबत बोलणी होतेय? राज ठाकरे म्हणाले...
Raj Thackeray
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 9:55 PM
Share

औरंगाबाद  : माझ्याकडे काय ऑप्शन्स आहेत, भाजपा (BJP) किंवा इतर कोणाशी आघाडी करायची याविषयी मला काहीही सांगायचं नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केलंय. औरंगाबाद(Aurangabad)मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

स्पष्ट उत्तरास टाळाटाळ राज ठाकरेंचा अजेंडा काय? म्हणावं एवढं काम झालेलं नाही. आगामी काळात भाजपासोबत बोलणी सुरू आहे का?आदी विषयांवर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. सध्या आघाडीचे दिवस आहेत. त्यामुळे आपण कोणाशी युती करणार? काल काशीच्या निमित्तानं देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिंदुत्वा(Hindutva)चा सूर आळवला. त्यामुळे मतदार अशा बाबींकडे आकर्षित होतात का? असं विचारलं असता त्यांनी ठोसं असं काहीही सांगितलं नाही. आता कोणतेही पत्ते उघड करणार नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

‘स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगू?’

आगामी निवडणुकीसाठी तुमची स्ट्रॅटेजी काय, असा प्रश्न मला नाशिक(Nashik)मध्येही विचारला. स्ट्रॅटेजी ही हिडनच असते. त्यामुळे उघड असं नसतं. तुमच्याशी बोलण्याइतपत आमचं काम झालंलं नाही. कामं काय आत्ताच सुरू झालीत असं नाही. ही प्रक्रिया सुरूच असते, असं ते म्हणाले. नाशिकमधला पाण्याची समस्या सोडवली. त्यामुळे तिथला 50 वर्षाचा पाणीप्रश्न सुटला, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, आजच जिल्हाध्यक्ष, शहर संघटक, शहर अध्यक्ष यासह विविध नियुक्त्या आज केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरवरही टीका केली. तर देशात मोदीलाट आहे किंवा मोदीकरिष्मा आहे, असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.

Maharashtra Vidhan Parishad Election Result: शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आले म्हणजे विजय निश्चित? फडणवीस म्हणतात, राजकारणात केमिस्ट्री चालते!

निवडणुकांचा हंगाम, मतदानकार्ड नाहीय? ऑनलाईन कसं मागवायचं माहितीय का?

देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले; अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका, ग्रामीण भागातील तरुणांचे रोजगाराच्या शोधात स्थलांतर

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.