निवडणुकांचा हंगाम, मतदानकार्ड नाहीय? ऑनलाईन कसं मागवायचं माहितीय का?

मतदानकार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला आता सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची खास जरुरी राहिली नाही. डिजिटल जमान्याची कास धरत सरकारने नागरिकांना मतदानकार्डसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. चला तर जाणून घेऊयात...

निवडणुकांचा हंगाम, मतदानकार्ड नाहीय? ऑनलाईन कसं मागवायचं माहितीय का?
voting
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 10:56 AM

मुंबई : कोणतेही सरकारी काम तुमच्या ओळखीशिवाय आणि ओळखपत्राशिवाय होतं का राजे हो ओळखपत्राशिवाय(Identity Card) अनेक योजनांचा लाभ तुम्हाला घेता येत नाही. बँकेत खाते उघडा अथवा राशनकार्ड काढायचे वा सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार बजवायचा असेल तर ओळखपत्र लागतेच, ते ओळखपत्र म्हणजे व्होटरकार्ड (Voter Card),  मतदानकार्ड. या एका कार्डवर तुम्ही आमदार, खासदार आणि त्यांच्यामुळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पण निवडू शकता की नाही. तर तुम्ही वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असेल आणि तुम्हाला या ओळखपत्रासाठी सरकारी कार्यालयाची चक्कर मारायची नसेल तर घरी बसून तुमच्या हातातील मोबाईल अथवा लॅपटॉपने तुम्ही सहजासहजी मतदानकार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करु शकता…

निवडणुकीत मतदानासाठी मतदान ओळखपत्र आवश्यक आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली असलेला कोणताही भारतीय नागरिक मतदार ओळखपत्रासाठी अर्ज दाखल करु शकतो. निवडणुकीत मतदान करण्यासाठी हे ओळखपत्र आवश्यक आहे. ओळखपत्र मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो. यासाठी केंद्र सरकारने एक पोर्टल सुरु केले आहे. त्याचा उपयोग नागरिकांना घेता येतो. या पोर्टलवर नागरीक मतदान ओळखपत्रासााठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. ज्यांनी अद्याप ओळखपत्रासाठी नोंदणी केलेली नाही, त्या नागरिकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने वेबसाईट उपलब्ध करुन दिली आहे. त्याद्वारे मतदान ओळखपत्र तयार करण्यासाठी अर्ज दाखल करता येतो. 18 वर्षे पूर्ण झालेला भारतीय नागरिकाकडे मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्जाच्या करण्याची सोय झाल्याने नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या खेटा घालण्याचा मनस्ताप वाचणार आहे. तसेच वेळ आणि पैशांची ही बचत होणार आहे. चला तर जाणून घेऊयात कसा करावा मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ते…

मतदान कार्ड हा महत्वपूर्ण दस्ताऐवज आहे. त्यात दिलेली माहिती लागलीच बदलता येत नाही. त्यामुळे गडबडीत मतदान कार्ड तयार करण्यासाठी अर्ज भरु नका. तुम्ही वास्तव्यास एका शहरात असताना दुस-याच शहरातील पत्ता देऊ नका किंवा मतदानासाठी गावाकडे जाता येईल अशा आशेवर गावाकडील पत्ता देण्याची घाई करु नका. सारासार विचार करुन हा अर्ज भरा. तुमची जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी भरताना लक्ष्यपूर्वक माहिती भरा. मित्राचा, नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक देऊ नका. काळजीपूर्वक अर्ज भरा आणि काही दिवसात तुमचे मतदानकार्ड तुमच्या पत्त्यावर आलेले असेल.

अशी आहे प्रक्रिया

स्टेप 1

तर https://nvsp.in/ या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुम्ही रजिस्टरेशन(Registration) करणे गरजेचे आहे. लॉगिन(Login) या पर्यायावर क्लिक केले की, ते तुम्हाला नवीन युजर आहात का असा प्रश्न विचारते. त्यावर क्लिक करा.  त्यानंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशनसाठी अर्ज येईल. त्यात तुमचे पुर्ण नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आय-डी आणि अनुषंगिक माहिती जमा करा.

स्टेप 2 

ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर रजिस्टर पर्याय निवडावा लागेल. तुमची नोंद झाल्यानंतर ई-मेल आयडी आणि पासवर्डद्वारे(Password) लॉगिन करा.

स्टेप 3 

आता तुम्हाला Fresh Inclusion and Enrollement या पर्यायचा उपयोग करायचा आहे. त्यानंतर तुमचं नागरिकत्व निवडा. राज्य निवडा आणि पुढची प्रक्रिया पार करा.

स्टेप 4

या टप्प्यात तुमच्या स्क्रीनवर फॉर्म 6 उघडेल. त्यात तुमचं नाव, जन्मतारीख, पत्ता अशा महत्वाच्या बाबी तुम्हाला नोंद करायचा आहेत. खाली दिलेले सबमिट बटणवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक मेल येईल. त्यात लिंक असेल. त्याद्वारे तुम्ही तुमच्या मतदान ओळखपत्राचे स्टेट्स पाहु शकता.

हुश्श, किती सोप्प ही की नाही…आहो, झालं की तुमचं रजिस्ट्रेशन व्होटरकार्डसाठी…या अर्जानंतर तुमच्या पत्त्यावर मतदान ओळखपत्र घरपोच मिळेल.

इतर बातम्या-

हॉर्न वाजवलात, गाडी चालवताना मोबाईलवर बोललात, हेल्मेट नाही घातलात तर सावधान, आजपासून खिसा रिकामा होणार, नियम लागू

राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला राज्य सरकारनं परवानगी नाकारली! काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.