AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक युनिटचे पैसे वसूल करणार, औरंगाबादेत महावितरण कंपनीचा इशारा, राज्यात 66 हजार कोटींची थकबाकी

ग्राहकांनी थकबाकी न भरता परस्पर वीज पुरवठा जोडून घेतला आहे का, याचीही पथके नेमून पडताळणी करण्यात यावी. असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील सिंघल यांनी दिला.

प्रत्येक युनिटचे पैसे वसूल करणार, औरंगाबादेत महावितरण कंपनीचा इशारा, राज्यात 66 हजार कोटींची थकबाकी
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 2:46 PM
Share

औरंगाबाद: शहरातील वीज वितरणच्या ग्राहकांनी (MSEDCL customers ) 66 रुपयांची थकबाकी असून आता ती हर तऱ्हेने वसूल करणार असल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांनी दिली आहे. महावितरण कंपनी ही वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेऊन ग्राहकांना पुरवठा करते. विकलेल्या वीजेचे पैसे ग्राहकांकडून दरमहा वसूल झाले नाही तर वीज निर्मिती कंपन्यांना आपण विकत घेतलेल्या वीजेचे पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे वीज विकत घेणे अवघड होते. महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे विकलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे दरमहा थकबाकीसह (Arrears) वसूल करा, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (Vijay Singhal) यांनी दिला.

राज्यात 66 हजार कोटींची थकबाकी

महाराष्ट्र राज्यात महावितरण कंपनीच्या वीज ग्राहकांकडे 66 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. शिवाय 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे, अशी माहिती महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. हा इशारा देताना सिंघल पुढे म्हणाले की, महावितरण कंपनी टिकली तरच सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुलभ दरात वीज पुरवठा करणे शक्य होईल. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर कोणताही ग्राहक विजेशिवाय राहू शकत नाही. थकबाकी न भरल्यामुळे काही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र या ग्राहकांनी थकबाकी न भरता परस्पर वीज पुरवठा जोडून घेतला आहे का, याचीही पथके नेमून पडताळणी करण्यात यावी. असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील सिंघल यांनी दिला.

औरंगाबाद परिमंडळातील अभियंत्यांची विशेष बैठक

महावितरण कंपनीच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडळातील अभियंत्यांची विशेष आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले, कार्यकारी संचालक देयके व महसूल विभागाचे योगेश गडकरी, औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, प्रभारी महाव्यवस्थापक वित्त व लेखा लक्ष्मीकांत राजेल्ली, अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते यांची उपस्थिती होती.

इतर बातम्या-

MSEDCL Electricity Assistant Result: महावितरणकडून विद्युत सहायक भरतीचा निकाल जाहीर, 4534 उमेदवारांची निवड

शरद पवार पावसात भिजले त्याची बातमी झाली, पण शेतकरी भिजतोय हे पाहायला पवारांना वेळच नाही; भाजप आमदार अभिमन्यू पवारांची टीका

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.