AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार पावसात भिजले त्याची बातमी झाली, पण शेतकरी भिजतोय हे पाहायला पवारांना वेळच नाही; भाजप आमदार अभिमन्यू पवारांची टीका

शरद पवार पावसात भिजले. त्याची बातमी झाली. पण शेतकरी भिजतोय त्याची बातमी झाली. पण शेतकरी भिजतोय हे पाहायला शरद पवार यांना वेळच नाही, अशी टीका भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. (abhimanyu pawar slams sharad pawar over farmers package)

शरद पवार पावसात भिजले त्याची बातमी झाली, पण शेतकरी भिजतोय हे पाहायला पवारांना वेळच नाही; भाजप आमदार अभिमन्यू पवारांची टीका
abhimanyu pawar
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 7:31 PM
Share

उस्मानाबाद: शरद पवार पावसात भिजले. त्याची बातमी झाली. पण शेतकरी भिजतोय त्याची बातमी झाली. पण शेतकरी भिजतोय हे पाहायला शरद पवार यांना वेळच नाही, अशी टीका भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे.

झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी व ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा ते तुळजापूर पायी दिंडी काढली. ही दिंडी तुळजापुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी सरकारला सद्बुद्धी दे किंवा सरकारमधून खाली उतरव असे तुळजाभवानी चरणी साकडे घातले.

विमा कंपन्यांची हिंमत कशी होते?

हे जनतेने दिलेले सरकार नाही. हे बनविलेले सरकार नसून त्यांना जनतेचे देणेघेणे नाही. शरद पवार साहेब पावसात भिजले त्याची बातमी झाली व त्यांचे आमदार विजयी झाले. मात्र पवार यांना शेतकरी भिजतोय हे पाहायला वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या 20 हजार हेक्टरी मदतीला आमचा पाठिंबा आहे मात्र त्यांच्या मागणीला कोणी विचारात नाही. विमा कंपन्यांची शेतकऱ्यांना लुटायची हिंमत कशी होते? सरकार व कंपनी साटेलोटे असल्याने प्रशासन कारवाई करीत नाही असा आरोप त्यांनी केला.

शेट्टी, चव्हाणांचे तरी ऐका

फडणवीस सरकारने संवेदना जाग्या ठेवून काम केले. मात्र या सरकारचे पालकमंत्री बांधावर आले नाहीत. पालकमंत्री यांना ममत्व असावे मात्र हे निर्ढावल्या सारखे वागतात. मदतीच्या रकमेत सरकारला आकड्याचा खेळ करायचा आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती शेतकरी आस ठेवून होता मात्र अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. आमचे नका ऐकू. पण सहकारी असलेले राजू शेट्टी, अशोक चव्हाण यांचं तरी ऐका, असं सांगतानाच खरडून गेलेल्या जमिनीसाठी 67 हजार हेक्टरी मदत आहे. मात्र त्यात अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकरी असा भेद न करता हेक्टरी 1 लाख मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

वसुली थांबवा

नदीकाठी ज्या शेतात पाणी साचले आहे त्यांना स्वतंत्र मदत द्या. वीज कंपनीची सावकारी पद्धतीने सुरू असलेली वसुली थांबवली पाहिजे. शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज द्या. राज्य सरकारने अद्याप केंद्र सरकारला मदत व नुकसानीची माहिती दिली नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

मोठेपण ! चंद्रकांत पाटील म्हणाले, माझी जीभ घसरली, नेमकं काय झालं?

Maharashtra News LIVE Update | कल्याण शीळ रोडवर पोलीस व्हॅनला भीषण आग

VIDEO : ऐकावं ते नवलच! मुंबईत भारतीय पोशाख परिधान केल्यास चक्क रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही\

(abhimanyu pawar slams sharad pawar over farmers package)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.