मोठेपण ! चंद्रकांत पाटील म्हणाले, माझी जीभ घसरली, नेमकं काय झालं?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख करण्याचा प्रश्नच नाही. एका कार्यक्रमात अनावधानाने तो उल्लेख झाला. (chandrakant patil gives clarification on comment on sharad pawar)

मोठेपण ! चंद्रकांत पाटील म्हणाले, माझी जीभ घसरली, नेमकं काय झालं?
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 5:38 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. त्यामुळे त्यांचा एकेरी उल्लेख करण्याचा प्रश्नच नाही. एका कार्यक्रमात अनावधानाने तो उल्लेख झाला, असं सांगतानाच त्या दिवशी एका क्षणापूरती माझी जीभ घसरली होती, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कबूल केलं.

चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही कबुली दिली आहे. शरद पवार साहेबांबद्दल मी आदराने बोललेल्या क्लिपचा पेटारा भरेल. मी त्या त्या वेळेस पवारांबद्दल आदराने बोललो ते पण कुठे तरी कोट करा. सांगलीला एक घरगुती कार्यक्रम होता. सार्वजनिक नव्हता. कोणत्याही माणसाचं स्लिप ऑफ टंग होतं. तसंच माझं स्लिप ऑफ टंग एका क्षणापुरतं झालं. तुम्ही क्लिप पाहिली तर लक्षात येईल. हे भाषण केवळ कार्यकर्त्यांना उद्देशून होतं, असं पाटील म्हणाले.

पवारांबद्दल आदरच

साखर उद्योगाबाबत पवारांना जेवढं कळतं तेवढं कुणाला कळत नाही. प्रमोद महाजनांनी आम्हाला सांगितलं होतं की, मुख्यमंत्री होताना पवारांनी 40 गोष्टी लिहून काढल्या. त्यातील 38 गोष्टी पूर्ण केल्या. असं केलं पाहिजे. अनेकवेळा मी त्यांच्यावर टीका करतो. पण ते वैयक्तिक भांडण नाही. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. माझ्या त्यांच्याबद्दलच्या आदराच्या वक्तव्याचं एक पेटारा भरेल. एखाद्या ठिकाणी काही झालं तर त्याबद्दल वावटळ उठवण्याची गरज नाही. माझ्या मनात पवारांबद्दल आदरच आहे, असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं.

बेदिलीने महापौर पडला

शरद पवारांचं आव्हानच नाही, असं विधानही पाटील यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. सांगलीला महापौर पडला. तो आपसातील बेदिलीने पडला. त्याचा संदर्भ घेऊन मी म्हटलं बाहेरचं आव्हान नाही आपल्यातीलच आव्हान आहे. भाजप कार्यकर्त्याने नंतर स्थायी, सामाजिक न्याय आणि महिला बाल कल्याण जिंकलं, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना, त्यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्याशिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं. मी कीय त्या नेत्याचं नाव घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरु आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं पाटील म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

कुठे हिमालय, कुठे टेकाड, टेंगूळ; संजय राऊतांची चंद्रकांतदादांवर जहरी टीका

VIDEO: राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार, कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यांच्या भेटीनंतर निर्णय

खायला मटण-मासे, पत्ते खेळायला पैसे, निवडणूक कशी लढवली, शिवसेना आमदाराने खरं खरं सांगितलं!

(chandrakant patil gives clarification on comment on sharad pawar)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.