Video : खायला मटण-मासे, पत्ते खेळायला पैसे, निवडणूक कशी लढवली, शिवसेना आमदाराने खरं खरं सांगितलं!

पूर्वी राजकारणात निष्ठा, तत्व, शब्दांना मान होता. परंतु अलीकडच्या काळात निष्ठा-तत्वांची जागा पैशाने घेतलीय. अशा प्रकारची उदाहरणे वारंवार समोरही येतात. अशी उदाहरणं लोकांमध्ये चर्चेत असतात. पण राजकारणासाठी पैशांचं वाढलेलं महत्त्व, तडजोडींना दिलेला छेद खुद्द अशा गोष्टी जेव्हा लोकप्रतिनिधीच बोलून दाखवतात, तेव्हा त्याचं महत्त्व अधिक तीव्रतेने लक्षात येतं.

Video : खायला मटण-मासे, पत्ते खेळायला पैसे, निवडणूक कशी लढवली, शिवसेना आमदाराने खरं खरं सांगितलं!
शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 1:37 PM

सांगोला : पूर्वी राजकारणात निष्ठा, तत्व, शब्दांना मान होता. परंतु अलीकडच्या काळात निष्ठा-तत्वांची जागा पैशाने घेतलीय. अशा प्रकारची उदाहरणे वारंवार समोरही येतात. अशी उदाहरणं लोकांमध्ये चर्चेत असतात. पण राजकारणासाठी पैशांचं वाढलेलं महत्त्व, तडजोडींना दिलेला छेद खुद्द अशा गोष्टी जेव्हा लोकप्रतिनिधीच बोलून दाखवतात, तेव्हा त्याचं महत्त्व अधिक तीव्रतेने लक्षात येतं. एवढं सगळं सांगायचं कारण म्हणजे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना कसं आमिष दाखवलं, निवडणूक जिंकण्यासाठी काय काय क्लुप्त्या केल्या, याचा पाढाच वाचून दाखवला.

सांगोला सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील आणि तालुक्यातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात शहाजी बापू पाटील यांनी निवडून येण्यासाठी सत्ता, पैसा आणि इतरही कश्या प्रकारची आमिषं दिली जातात, याची उघड उघड कबुलीच दिली.

खायला मटण-मासे, पत्ते खेळायला पैसे

शहाजी बापू पाटील म्हणाले, “सांगोला साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माजी आमदार(कै.) गणपतराव देशमुख यांच्याकडे माझे काही संचालक घ्या असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी गणपतराव देशमुख यांनी वेळ निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर दिल्ली, हरियाणा, लुधियाना येथून विमानाने सभासदांना आणले. एवढंच नाही तर सभासदांना तीन तीन हजार रुपये वाटप केले. निवडणुकी दरम्यान 1700 सभासदांना कोल्हापूरात ठेवले. त्या ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची व पत्ते खेळण्यासाठी लागणारे पैसेही दिले”

सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदारांना तीन -तीन हजार रुपये रोख वाटले, शिवाय त्यांना मटण आणि माशांची पार्टीही दिली. त्या काळात 57 लाख रुपये वाटून कारखान्याची निवडणूक लढवली, असा मोठा गौप्यस्फोट आमदार पाटील यांनी केला.

कारखान्याच्या दुरावस्थेला मी देखील जबाबदार

कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पैसे वाटून आणि त्यांना मटन खायला घालून कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख गटाला कसा हिस्सका दाखवला हे सांगताना त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीत आपण कसा प्रताप केला हे देखील सांगून टाकले. कारखान्याच्या दुरावस्थेला माझ्या सह सर्वच नेते जबाबदार आहेत. मी देखील तितकाच पापी असल्याची कबुली दिली.

आमदार पाटलांच्या कबुलीने राज्यातील कारखान्यांत चालणाऱ्या गैर कारभाराचे सत्य समोर

आमदार पाटील यांनी कारखाना उभारणीमध्ये कोणी कोणी कसा गैर कारभार केला याची उदाहणे देत, कारखान्याच्या दुरावस्थेला आम्ही जबाबदार असल्याचेही मान्य केले. आमदार पाटलांच्या गौप्यस्फोटानंतर राज्यातील सहकारी साखर कारखान्यात चालणाऱ्या गैर कारभाराचे सत्य समोर आले आहे.

(How Bribes to voters to win elections Reveal Shivsena MLA Shahaji bapu Patil)

हे ही वाचा :

शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी पवार सारखेच, राजू शेट्टींनी बाह्या सरसावल्या

निवडणुकीसाठी मनसेचा ‘डिजिटल राजमार्ग’, राज ठाकरेंच्या विचारांना follow करण्याचं आवाहन

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.