AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded Politics | माहूरात काँग्रेसला धक्का, महाविकास आघाडी फिसकटली, नांदेड महापालिकेत स्वबळाचे संकेत?

नांदेड जिल्ह्यात भाजपचे खासदार आणि तीन आमदार असले तरीही नांदेड शहरात भाजपची फार ताकद नाही. नांदेड महापालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे

Nanded Politics | माहूरात काँग्रेसला धक्का, महाविकास आघाडी फिसकटली, नांदेड महापालिकेत स्वबळाचे संकेत?
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 19, 2022 | 3:00 AM
Share

नांदेड | राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थेतही हीच आघाडी कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुका पाहता महाविकास आघाडी कितपत तग धरु शकेल, याची शाश्वती देत येत नाही. स्थानिक पातळीवर जो पक्ष बलशाली आहे, तोच आघाडीच्या विरोधात दिसतो. तरीही एकत्रितपणे भाजपविरोधात लढण्याचा प्रयत्न या तिन्ही पक्षांचा सुरु आहे. मात्र ऐनवेळी सत्तेची गणितं चुकतात. माहूरमध्ये (Mahur Nagar Panchayat) तर शिवसेना आणि राष्ट्रवादीनंच  महाविकास आघाडीला सुरुंग लावलेला दिसतोय. माहूर नगरपंचायतीत महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. याचे पडसाद आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीदेखील तसेच संकेत दिले आहेत.

नांदेड नगरपंचायतीत काय घडलं?

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, नायगाव आणि माहूर या तीन ठिकाणी नगर पंचायत निवडणुका झाल्या. अर्धापूर आणि नायगाव येथे काँग्रेसला बहुमत मिळाले. माहूरमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जास्त मते मिळाली. इथे हे दोन पक्षा एकत्र येतील असे वाटत होते. मात्र राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजूला सारत शिवसेनेच्या नगरसेवकांना हाताशी घेतले आणि सत्ता स्थापन केली. यामुळे काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून येथील काँग्रेसचे नेते संतप्त आहेत. आता कुठेच महाविकास आघाडी होणार नाही, असा बहुतांश कार्यकर्त्यांचा सूर आहे.

नांदेड महापालिकेची स्थिती काय?

नांदेड जिल्ह्यात भाजपचे खासदार आणि तीन आमदार असले तरीही नांदेड शहरात भाजपची फार ताकद नाही. नांदेड महापालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. 81 पैकी 73 जागा काँग्रेसकडे आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता, काँग्रेसने नांदेड शहरावर विकास डोळ्यासमोर ठेवून 800 ते 900 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. जनतेला सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी काँग्रेस प्रयत्न करत असून महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचे काँग्रेसचे संकेत आहेत.

पालकमंत्री अशोक चव्हाण काय म्हणतात?

नांदेड काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याबाबत शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही. महापालिका निवडणुकीलाही अजून बराच अवकाश आहे. त्यामुळे भविष्यातील परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेतला जाईल.

इतर बातम्या-

Aurangabad Mystery| गांधेली शिवारातील स्त्री-पुरुषाचा मृत्यू होरपळूनच! दोघांचे संबंध काय, अजून रहस्य कायम!

औरंगाबाद शिवजयंती | दोन दिवस क्रांती चौकातील वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणता? वाचा सविस्तर

Follow Us
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब