औरंगाबाद| शहरातील मध्यवर्ती भागातील क्रांती चौक येथे शिवजयंती (Aurangabad Shiv Jayanti) निमित्त भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती असून 18 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला क्रांती चौक (Kranti Chauk) येथील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध संघटनांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ढोलपथक, लेझीम पथक, तलवारबाजीची प्रात्यक्षिकं आयोजित कऱण्यात आली आहेत. शिवसेना, मनसेच्या वतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सादरीकरणही होत आहे. क्रांती चौकात शेकडो शिवप्रेमींची गर्दी जमली असून वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारसाठी औरंगाबाद शहरातील वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहेत.