AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | नांदेडमध्ये शिवसैनिकांचे आक्रमक आंदोलन, किरीट सोमय्यांचा पुतळा जाळला

औरंगाबाद शिवसेनेच्या वतीने क्रांती चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच परभणी, हिंगोलीतही किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हिंगोलीत आमदार संजय बांगर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.  देशाशी गद्दारी करणाऱ्या सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

Nanded | नांदेडमध्ये शिवसैनिकांचे आक्रमक आंदोलन, किरीट सोमय्यांचा पुतळा जाळला
शिवसैनिकांची नांदेडमध्ये निदर्शनं Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 07, 2022 | 1:07 PM
Share

नांदेड | भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी आयएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) नावाखाली कोट्यवधी रुपये हडपले असून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने होतेय. नांदेडमध्येही शिवसैनिकांनी (Nanded Shiv Sena) ही मागणी लावून धरत आक्रमक आंदोलन केले. नांदेड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आधी किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला जोडे मारण्यात आले. किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळाही जाळण्यात आला. संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी जमवून तो स्वतःच्या घशात घातल्याचा गंभीर आरोप केला. त्याचे पडसाद आज महाराष्ट्रात दिसून येत आहेत. शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद, हिंगोली, परभणीतही सोमय्यांचा निषेध करण्यात आला.

नांदेडमध्ये तीव्र निदर्शनं

नांदेडमध्ये शिवसैनिकांनी किरीट सोमय्याच्या पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचे दहन केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. विक्रांत नौका वाचवण्याच्या नावाखाली सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेने केला. आपला भ्रष्टाचार लपवून ठेवत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ऊठसूट टीका करणाऱ्या सोमय्या यांच्या विरोधात सेनेने ही निदर्शने केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले, तसेच सोमयाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय.

औरंगाबाद, परभणी, हिंगोलीतही आंदोलन

औरंगाबाद शिवसेनेच्या वतीने क्रांती चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच परभणी, हिंगोलीतही किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हिंगोलीत आमदार संजय बांगर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.  देशाशी गद्दारी करणाऱ्या सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

इतर बातम्या-

खासगी विकासकांपेक्षा सिडकोची घरे महाग, घराची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

Sanjay Biyani Murder | बिल्डर संजय बियाणींच्या हत्येने पालकमंत्रीही अस्वस्थ, अशोक चव्हाण बियाणी कुटुंबाच्या भेटीला

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ