खासगी विकासकांपेक्षा सिडकोची घरे महाग, घराची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

महामुंबई क्षेत्रात खासगी विकासकांपेक्षा (Developer) सिडकोने बांधलेली घरे स्वस्त किमंतीत मिळतील या अपेक्षेने अर्ज करणाऱ्या ग्राहकांची निराशा होऊ लागली आहे. सिडकोने गुढी पाडव्याच्या निमित्ताने जाहीर केलेल्या विक्री महायोजनेतील घरे ही आजूबाजूच्या खासगी विकासकांच्या घरांपेक्षा (house) महाग असल्याचे दिसून येत आहे.

खासगी विकासकांपेक्षा सिडकोची घरे महाग, घराची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
प्रातिनिधिक फोटो Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 12:55 PM

महामुंबई क्षेत्रात खासगी विकासकांपेक्षा (Developer) सिडकोने बांधलेली घरे स्वस्त किमंतीत मिळतील या अपेक्षेने अर्ज करणाऱ्या ग्राहकांची निराशा होऊ लागली आहे. सिडकोने गुढी पाडव्याच्या निमित्ताने जाहीर केलेल्या विक्री महायोजनेतील घरे ही आजूबाजूच्या खासगी विकासकांच्या घरांपेक्षा (house) महाग असल्याचे दिसून येत आहे. सिडकोने (CIDCO) खारघर, घणसोली, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या नोडमध्ये काही जुनी व नवीन घरे, गाळे, भूखंड यांची विक्री दोन एप्रिल रोजी जाहीर केली आहे. ही घरे ई- लिलाव किंवा निविदा पद्धतीने विकली जाणार आहेत. त्यामुळे या घरांसाठी सिडकोने राखीव ठेवलेल्या किमती भरमसाठ असून त्या आजूबाजूच्या खासगी विकासकांच्या घरांपेक्षा महाग आहेत. सिडको अथवा म्हाडाची घरे स्वस्त किमतीत मिळत असल्याने ग्राहक त्यांना पसंती देत असल्याचे दिसून येते.

जुन्या व नव्या घराची सोडत

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोने शिल्लक जुन्या व नवीन घरांची सोडत काढण्यात आली आहे. यात 278 घरे व 275 भूखंडांचा समावेश आहे. नेरुळ येथील सी वूड या अनिवासी संकुलात शिल्लक असलेल्या चार घरांची किंमत थेट तीन ते चार कोटीच्या घरात आहे. या संकुलातील इमारत क्रमांक 54 मधील 1230 चौरस फुटाच्या एका घराची किंमत 3 कोटी 31 लाख 69 हजार नमूद करण्यात आलेली आहे. मात्र या क्षेत्रात हेच घर तीन कोटी रुपयांच्या कमी किमतीत मिळू शकेल असा रियल इस्टेट मधील जाणकरांचे मत आहे. हाच प्रकार व्हॅली शिल्प (खारघर) मधील घरांबाबत आहे. या इमारतीतील एक घर सिडकोने 1 कोटी 13 लाख 74 हजार रुपये किमतीला विकण्यास काढले आहे.

सर्वच मोठ्या घरांच्या किमती एक कोटींपेक्षा जास्त

खारघरमधील सिडकोच्या सर्वच मोठय़ा घरांच्या किमती या एक कोटीपेक्षा जास्त आहेत. सिडकोच्या घरांच्या किमती या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर केल्या जात असून, अर्थशाश्त्र विभागाकडून त्या सादर केल्या जात असतात. त्यामुळे या घरांच्या किमती कमी जास्त करण्याचा अधिकार हा संचालक मंडळाचा आहे. सिडकोने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर केलेली घर विक्री योजना ही मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांची चेष्टा करणारी आहे. पाच नोडमधील सिडकोच्या या घरांच्या किमती अवाच्या सव्वा असून, खासगी विकासकांपेक्षा जास्त किमतीच्या आहेत. सर्वसामान्यांना घर कसे मिळणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या

धनादेश फसवणुकीला ‘पीएनबी’चा चाप ! ग्राहकांसाठी सुरु केली खास सुविधा

CNG Price Hike : सुटकेचा गुरुवार, पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, सीएनजीचे भाव मात्र 3 रुपयाने वाढले

ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अ‍ॅपची न्यायालयाकडून गंभीर दखल, अ‍ॅपवर नियंत्रण कधी येणार? ‘आरबीआयला’ सवाल

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.