JOBS: औरंगाबादेत राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत 17 ते 60 हजार रुपयांपर्यंत पगाराची नोकरी, वाचा कोणती पदे भरणार?

| Updated on: Oct 06, 2021 | 6:33 PM

सदर पदभरीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

JOBS: औरंगाबादेत राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत 17 ते 60 हजार रुपयांपर्यंत पगाराची नोकरी, वाचा कोणती पदे भरणार?
Follow us on

औरंगाबाद : पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माता या पदांसाठी औरंगाबादेत लवकरच भरती होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद (National Health Mission, Office of Taluka Health Officer) इथे ही भरती प्रक्रिया होईल. यासाठीची अधिसूचना (NHM Aurangabad Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

पुढील पदासाठी भरती प्रक्रिया

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full-Time Medical Officer)

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer)

स्टाफ नर्स (Staff Nurse)

औषध निर्माता (Pharmacist)

या पदांसाठी वयाची अट काय?

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full-Time Medical Officer) – खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष

अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer) – खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष

स्टाफ नर्स (Staff Nurse) – खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष

औषध निर्माता (Pharmacist) – खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष

शैक्षणिक पात्रता किती आवश्यक ?

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full-Time Medical Officer) – MBBS ची डिग्री आणि इंटर्नशिप केली असणं आवश्यक आहे.

अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer) – MBBS ची डिग्री आणि इंटर्नशिप केली असणं आवश्यक आहे.

स्टाफ नर्स (Staff Nurse) – GNM, B.Sc Nursing मध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

पगार कितीपर्यंत मिळणार?

औषध निर्माता (Pharmacist) – D.Pharmacy ची पदवी असणं आवश्यक आहे.

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full-Time Medical Officer) – 60,000/- रुपये प्रतिमहिना

अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer) – 30,000/- रुपये प्रतिमहिना

स्टाफ नर्स (Staff Nurse) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

औषध निर्माता (Pharmacist) – 17,000/- रुपये प्रतिमहिना

इतर बातम्या-

Job Alert : नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीत नोकरीची संधी, 114 जागांसाठी होणार थेट मुलाखत 

सप्टेंबर महिना रोजगारासाठी उत्तम, 85 लाख रोजगार निर्माण, वाचा संपूर्ण अहवाल