Sharad Pawar Video : राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकणाऱ्या पवारांना एक खातं मात्र जड गेलं! खुद्द पवारांनीच सांगितला किस्सा

| Updated on: Apr 26, 2022 | 11:53 PM

देशाचे संरक्षणंत्रिपद संभाळले, तसेच पवार मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्या सरकारच्या काळात अनेक वर्षे देशाचे कृषीमंत्रीही राहिले आहेत. मात्र याच शरद पवारांना राज्याच्या मंत्रिमंडळात असताना एक खातं अत्यंत अवघड वाटलं होतं.

Sharad Pawar Video : राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकणाऱ्या पवारांना एक खातं मात्र जड गेलं! खुद्द पवारांनीच सांगितला किस्सा
राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकणाऱ्या पवारांना एक खातं मात्र जड गेलं!
Image Credit source: tv9
Follow us on

औरंगाबाद : आज शरद पवार (Sharad Pawar) औरंगाबादेत शिक्षकांच्या पुस्तक वितरणाच्या कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी त्यांनी एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. आपण आजपर्यंत शरद पवारांना देशातल्या दिग्गज राजकारण्यापैकी एक म्हणून पाहत आलोय. शरद पवारांनी देशातली अनेक मोठी पद संभाळली आहे. अगदी गावच्या राजकारणापासून राजकारमाची सुरूवात करणाऱ्या पवारांची राजकीय कारकिर्द देशपातळीवर सध्याही गाजत आहे. त्यांना कधी भावी पंतप्रधान (Prime Minister) म्हणूनही पहिलं गेलं आणि अजूनही त्याबाबत बोललं जातं. शरद पवारांनी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद संभाळले. त्यानंतर देशाचे संरक्षणंत्रिपद संभाळले, तसेच पवार मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्या सरकारच्या काळात अनेक वर्षे देशाचे कृषीमंत्रीही राहिले आहेत. मात्र याच शरद पवारांना राज्याच्या मंत्रिमंडळात असताना एक खातं अत्यंत अवघड वाटलं होतं. त्याचा किस्सा पवारांनी या कार्यक्रमात सांगितला आहे. हा कार्यक्रम शिक्षकांचा होता. आपसूक पवारांनी यावेळी मला एकेकाळी शिक्षण खातं अवघड वाटल्याचे सांगितले आहे.

शिक्षण खातं मला अवघड वाटलं

शरद पवार म्हणाले, “आजच्या कार्यक्रमात येण्यापूर्वी मला काळजी वाटत होती, खरं सांगायचं म्हणजे मी एकदा शिक्षणमंत्री होतो. काही वर्षे मी शिक्षणंत्री म्हणून मी काम केलं, पाचवर्षे पूर्ण नाही केलं, मात्र त्याच्या एवढे अवघड काम कोणते नाही. शिक्षण संघटनेचे नेते येऊन सांगत निर्णय घेण्याबाबत सांगत असतात. मात्र हा निर्णय घेण्यासाठी आर्थिक बोजा किती हा ध्यानात आल्यानंतर अवघड वाटलं. शिक्षण संघटनेचे लोक प्रश्न मांडत असतात. मात्र त्यात होत काही नाही, तेव्हा शिक्षण संघटनेचे लोक म्हणतात हा मंत्री आहे. याला अजून समजलेलं काही नाही, ते पुन्हा सांगतात. महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ बदललं. वसंतराव नाईक गेले, शंकरराव चव्हाण आले. त्यांना मी सांगितलं, तुम्ही मला घेणार असाल, तर मला शिक्षण खात्यातून काढा आणि शेती किंवा दुसरं खातं द्या. मग मला शेती मिळाली. आणि माझी सुटका झाली.” पवरांनी हा किस्सा सांगताच हशा पिकला.

शिक्षकांचं गणित कच्चं

तसेच पवार म्हणाले आजही यांनी खूप मागण्या केल्या आहेत की मला खात्री आहे की आज काही त्याची सांगड बसणार नाही. पवार बोलायला सुरूवात करतानाच म्हणाले की हे मला म्हणाले आम्हाला एक पंधरा मिनिटं द्या, सुरूवात करा आणि तुम्ही जावा, मात्र आता खूप वेळ होऊन गेला. त्यामुळे शिक्षणकांचं गणितच इतके कच्चे असेल तर विद्यार्थ्यांचं गणित विचारूच नका. देशाच्या राजकारणात अनेकांवर भारी पडणाऱ्या पवारांनी असे किस्से सांगितल्याने समोर बसलेल्यांसाठीही ती एक मेजवानीच होती. ऐकणाऱ्यांनीही या मेजवानीचा भरपूर आनंद घेतला.