AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भजे घेण्यासाठी रेल्वेतून उतरला खाली अन् ट्रेन सुरु झाली! पुढे जे घडलं ते चांगलंच अंगलट आलं…

ज्या व्यक्तीने चेन ओढली त्याच्यावरच पोलीस अधिकारी रागवले. त्यामुळे इतर प्रवाशांनी या घटनेसाठी जे कारणीभूत आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, असा सल्ला दिला. त्यानंतर रेल्वेतील अधिकाऱ्यांनी त्या वयोवृद्धाकडे मोर्चा वळवला.

भजे घेण्यासाठी रेल्वेतून उतरला खाली अन् ट्रेन सुरु झाली! पुढे जे घडलं ते चांगलंच अंगलट आलं...
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 02, 2022 | 6:07 PM
Share

औरंगाबादः रेल्वेत बसल्यावर काही महत्त्वाच्या कारणासाठी रेल्वे थांबवायची असल्यास प्रत्येक कोचमध्ये चेन ओढण्याची (Railway pulling the chain) सुविधा देण्यात आली आहे. मात्र ही सुविधा अत्यंत गंभीर कारणांसाठीच वापरायची असते. अगदी साध्या गोष्टींसाठी अवघी रेल्वेच वेठीला धरणे प्रवाशांना चांगलेच महागात पडू शकते. औरंगाबादकडे येणाऱ्या ट्रेनमध्येही (Aurangabad train) असाच प्रकार घडला. मुंबईहून जालन्याकडे येणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमधील (Jana Shatabdi Express) प्रवाशाने साखळी ओढली अन् ट्रेन थांबली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रेल्वे थांबवण्याचे कारण तपासले. तेव्हा भजे घेण्यासाठी उतरलेल्या प्रवाशाच्या मदतीसाठी हा प्रकार केल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून रेल्वे पोलिसांचे टाळकेच सरकले.

कुठे आणि कधी घडला प्रकार?

मंगळवारी मुंबईहून जालन्याकडे येणारी जनशताब्दी एक्सप्रेस दुपारी 3 वाजेच्या सुमारास इगतपुरी स्टेशनवर थांबली. भूक लागल्यामुळे रेल्वेतील एक प्रवासी भजे घेण्यासाठी खाली उतरला. दरम्यान, रेल्वे सुरु झाली. धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत असलेल्या वृद्धाला पाहून सह प्रवाशाने चेन ओढून रेल्वे थांबवली. रेल्वे थांबताच वृद्ध प्रवासी रेल्वेत बसला. त्यानंतर मात्र कुणी चेन ओढळी हे विचारत रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस D-4 डब्यात शिरले. कुणी चेन ओढली याचा शोध घेण्यात आला. मात्र ज्या व्यक्तीने चेन ओढली होती, त्याने मी प्रामाणिक हेतून चेन ओढली, असे सांगितले. त्यानंतरही अधिकाऱ्यांचा राग शांत झाला नाही.

ज्याच्यासाठी चेन ओढली, त्यालाच शिक्षा!

ज्या व्यक्तीने चेन ओढली त्याच्यावरच पोलीस अधिकारी रागवले. त्यामुळे इतर प्रवाशांनी या घटनेसाठी जे कारणीभूत आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, असा सल्ला दिला. त्यानंतर रेल्वेतील अधिकाऱ्यांनी त्या वयोवृद्धाकडे मोर्चा वळवला. तुम्ही गुन्हा केलाय, खाली उतरा असे सांगितले. यावर मी दंड भरतो, पण खाली उतरवू नका, अशी विनणी वृद्धाने केली. मात्र नियमावर बोट ठेवत रेल्वे अधिकाऱ्याने त्या वयोवृद्धाला पुढील कारवाईसाठी खाली उतरवले आणि रेल्वे पुढे नेली.

नियमात नेमके काय बसते?

वयोवृद्धाच्या मदतीसाठी रेल्वेची आपत्कालीन सुविधा प्रवाशाने वापरली. मात्र हे प्रकरण त्याच्या चांगेलच अंगलट आले. मदतीच्या भावनेतून हा प्रयत्न केला तर कारवाईला सामोरे जावे लागते. मग ही चेन कशासाठी आहे, असा प्रश्न प्रवाशांनी केला. यावर आता नियम बदलले आहेत. आम्ही आमचे कर्तव्य बजावत आहोत, असे म्हणत रेल्वे अधिकाऱ्यांनी डब्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे प्रवाशाची, वृद्धाची मदत करण्याची सुविधा या नियमात नसेल तर नियमात नेमकं काय बसतं, असा सवाल प्रवाशांनी केला.

इतर बातम्या-

Gajanan Babar| मावळचे पहिले शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी 79 वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकप्रिय Tata Nexon आता CNG सह येणार, Maruti Brezza चं सीएनजी व्हेरिएंटदेखील सज्ज

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...