मध्य रेल्वेचा पुन्हा 72 तासांचा मेगा ब्लॉक; लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

मध्य रेल्वेवर (Central Railway) पुन्हा एकदा 72 तासांचा मेगा ब्लॉक (Mega block) घेण्यात येणार आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सध्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठीच हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेचा पुन्हा 72 तासांचा मेगा ब्लॉक; लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 9:57 PM

मुंबई : मध्य रेल्वेवर (Central Railway) पुन्हा एकदा 72 तासांचा मेगा ब्लॉक (Mega block) घेण्यात येणार आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सध्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठीच हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिनांक 5 , 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी हा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान, शंभर पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस (Express) आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 350 लोकल ट्रेन देखील या मेगा ब्लॉकदरम्यान धावणार नाहीत. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान 5 व्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि 6 व्या लाईनवर हा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस बंद राहणार आहेत. प्रवाशांनी याकाळात सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या दिनांक पाच, सहा आणि सात फेब्रुवारी रोजी बंद राहणार आहेत. याबरोबरच डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच दिवा-वसईदरम्यान धावणाऱ्या मेमु ट्रेन देखील या काळात बंद राहणार आहेत. तर सर्व फास्ट गाड्या स्लो मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल

ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी आतापर्यंत अनेक मेगा ब्लॉक घेण्यात आले असून, आता पुन्हा एकदा पाच फेब्रुवारी ते सात फेब्रुवारीदरम्यान एक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक तब्बल 72 तासांचा असणार आहे. मध्यरेल्वेकडून वारंवार घेण्यात येत असलेल्या या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत असून, वाहतूकीची देखील समस्या निर्माण होते, मात्र ही समस्या सोडवण्यासाठी मागील ब्लॉकच्या वेळी महापालिका आणि रेल्वे विभागाच्या वतीने जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar Health Update : प्रकृतीत सुधारणा, पण डिस्चार्ज कधी? लतादीदींबाबत आता डॉक्टरांनी काय म्हटलं?

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज 16 फेब्रुवारी पासून भरता येणार, शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबईतील निर्बंध आणखी शिथील, रात्रीची संचारबंदी हटवली, नवे नियम काय?

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.