आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज 16 फेब्रुवारी पासून भरता येणार, शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम 12(1) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. याबाबत आरटीई पोर्टलवर सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील. पोर्टलवरील वेळोवेळी दिलेल्या सूचनांची सर्व संबंधितांती नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही शिक्षक संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज 16 फेब्रुवारी पासून भरता येणार, शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती
वर्षा गायकवाडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 9:01 PM

मुंबई : शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक (Time Table) प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार 01 फेब्रुवारी 2022 पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज 01 फेब्रुवारी 2022 ऐवजी बुधवार 16 फेब्रुवारी 2022 पासून भरता येतील, संबंधितांनी या बदलाची नोंद घेऊन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (Right to Education Act) 2009 कलम 12(1) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. याबाबत आरटीई पोर्टलवर सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील. पोर्टलवरील वेळोवेळी दिलेल्या सूचनांची सर्व संबंधितांती नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही शिक्षक संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

10वी ,12 वी परीक्षा आहे त्याच तारखेला होणार- गायकवाड

दोन दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावी परीक्षेच्या तारखांबाबतही वक्तव्य केलं होतं. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत, असं त्या म्हणाल्या. आम्ही राज्य सरकारच्या वतीनं आणि शिक्षण विभागाच्यावतीनं कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. दहावी बारावी परीक्षांसदर्भात कुणी तरी माध्यमातून खोटी बातमी पेरली होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाची परिस्थिती माॅनिटर करत आहोत, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. जे विद्यार्थी कोरोना काळात परीक्षेला बसू शकणार नाही त्यांच्यासाठी सप्लिमेंट्री परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे. ठरलेल्या परीक्षांच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

हिंदुस्तानी भाऊला अटक, 3 दिवसांची पोलीस कोठडी

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन स्वरुपातच घेण्यात यावी या मागणीसाठी काल राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धारावीमध्ये शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांकडून या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. मुंबईसह नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांमध्येही आज दहावी आणि बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनामागे हिंदुस्तानी भाऊ या नावाने परिचित असलेला विकास पाठक होता. त्यानंतर आज हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Nitesh Rane : सिंधुदुर्गात दणका मिळाल्यानंतर राणेंची पुन्हा हायकोर्टात धाव, जामीन अर्ज दाखल

‘उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प, नोकरदार आणि सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग’, मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.