AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : सिंधुदुर्गात दणका मिळाल्यानंतर राणेंची पुन्हा हायकोर्टात धाव, जामीन अर्ज दाखल

आता सिंधुदुर्ग कोर्टाने जामीन फेटाळल्याच्या आदेशाची प्रत हाती लागताच नितेश राणेंनी पुन्हा जामीनासाठी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

Nitesh Rane : सिंधुदुर्गात दणका मिळाल्यानंतर राणेंची पुन्हा हायकोर्टात धाव, जामीन अर्ज दाखल
नितेश राणे, आमदार, भाजप
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 5:40 PM
Share

मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack Case )प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane bail reject) यांच्या अडचणी चांगल्याच वााढल्या आहेत. कारण आजही नितेश राणेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून सावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आमदार नितेश राणेंची धावाधाव सुरू आहे. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळ्यानंतर राणेंनी हायाकोर्टात (High Court) धाव घेतली, तिथेही दिलासा न मिळाल्यानं राणें सुप्रीम कोर्टात गेले, त्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्यांना दहा दिवसांची मुदत देत, सत्र न्यायालयाचा रस्ता दाखवला. सत्र न्यायालयाने आज राणेंना पुन्हा दणका दिला आणि जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर राणेंना अटक होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र काही वेळात आम्ही पुन्हा हायकोर्टात जाणार असल्याची माहिती राणेंच्या वकिलांकडून देण्यात आली. आता सिंधुदुर्ग कोर्टाने जामीन फेटाळल्याच्या आदेशाची प्रत हाती लागताच नितेश राणेंनी पुन्हा जामीनासाठी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांनी पुन्हा हायोकोर्टात अर्ज दाखल केला आहे.

राणेंना हायकोर्टात जामीन मिळणार?

हायकोर्टात नितेश राणेंच्या जामीन अर्जावर कधी सुनावणी होणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नितेश राणेंच्या अर्जावर सुनावणी कधी? हे उद्या स्पष्ट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आधीच हायकोर्टाने एकदा जामीन फेटाळत नितेश राणेंना दणका दिला आहे. त्यामुळे यावेळी तरी राणेंना हायकोर्टात दिलासा मिळणार की यावेळीही राणेंच्या पदरी निराशा पडणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाने दहा दिवासांची मुदत दिल्यामुळे राणेंना दहा दिवस कोठडी नाही, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. अशी माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली आहे. तर पोलिसांनी राणेंना अडवल्यावरून त्यांना विचारले असता ही पोलिसांची दादागिरी आहे. पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत नितेश राणेंना अटक करायाची आहे, अशी प्रतिक्रिया वकिलांनी दिली आहे. पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला आहे, ते आम्ही सुप्रीम कोर्टात मांडू असेही राणेंचे वकील म्हणाले आहेत.

नितेश राणेंचा जामीन अर्ज मेंटेनेबल नाही म्हणत कोर्टाने जामीन फेटाळल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. राणे यांनी आधी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे शरण यावे आणि त्यानंतर जामीन अर्ज करावा असे मत कोर्टाने नोंदवले असल्याची देण्यात आली आहे. नितेश राणे हे आरोपी असून ते सुनावणीवेळी कोर्टात बसायचे, त्यांनी कोर्टात मी शरण यायला तयार आहे, असेही सांगितले. त्यावर कोर्टात बराच युक्तीवाद झाला, न्यायालयीन दाखले दिले गेले. त्यानंतर नितेश राणेंना एकतर जामीन घेऊन बाहेर जाऊ द्यायला हवे होते नायतर त्यांना, परवानगी घेऊन बाहेर जाऊ द्यायला हवं होतं मात्र आमच्या युक्तीवादाप्रमाणे कोणतीही ऑर्डर झाली नाही. त्यामुळे सरकारी वकिलांनी लेखी हुकूम करावा अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. यावर आम्ही सर्व वकील विचार विनिमय करून निर्णय घेऊ असे सूचक विधान सरकारी वकिलांनी केलं आहे.

VIDEO: कोर्टानं जामीन फेटाळला, पोलिसांनी नितेश राणेंची गाडी अडवली, निलेश- पोलिसात फुल्ल बाचाबाची

Nitesh Rane Bail Application : नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, पण अटक नाही! वकिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप

नितेश राणेंना कोर्टाचा मोठा दणका, जामीन अर्ज फेटाळला, पुढे काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.