प्राध्यापिका ते पहिल्या महिला शिक्षण मंत्री; वाचा, वर्षा गायकवाडांची राजकीय भरारी!

प्राध्यापिका ते पहिल्या महिला शिक्षण मंत्री; वाचा, वर्षा गायकवाडांची राजकीय भरारी!
varsha gaikwad

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड गेल्या वर्षांपासून चर्चेत आहेत. (know about maharashtra's first woman education minister varsha gaikwad)

भीमराव गवळी

|

Apr 10, 2021 | 6:39 PM

मुंबई: राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड गेल्या वर्षांपासून चर्चेत आहेत. कोरोनाचं संकट निर्माण झाल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. मुलांच्या भवितव्याबाबतचा निर्णय घेणं हे अत्यंत कठिण काम होतं. मात्र, वर्षा गायकवाड यांनी हे शिवधनुष्य लिलया पेललं. त्यामुळे त्या आणि त्यांचं खातं चर्चेत आलं. राज्याच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री असणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा. (know about maharashtra’s first woman education minister varsha gaikwad)

राजकारणाचं बाळकडू घरातूनच

वर्षा गायकवाड या काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. 3 फेब्रुवारी 1975 रोजी त्यांचा जन्म झाला आहे. वडील एकनाथ गायकवाड माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे वर्षा यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालेलं आहे. राजकारणात येण्यासाठी त्यांना फारसा संघर्ष कारावा लागला नाही. मात्र, धारावीतून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मतदारसंघ टिकून ठेवण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागली आहे. मतदारसंघात विकासाची कामे करतानाच लोकसंपर्क सातत्याने ठेवून त्यांनी मतदारसंघावरील पकड मजबूत केली आहे. त्यामुळेच त्या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून येऊ शकल्या आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रीपद देण्यात आलं आहे. शिक्षण मंत्री होणाऱ्या त्या राज्यातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत.

स्वयंसेवी संस्थेत काम

वर्षा गायकवाड यांनी गणित या विषयात पदवी घेतली आहे. राजकारणात येण्यापूर्वी पाच वर्ष त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलं. बालपणापासूनच घरातून राजकारण आणि समाजकारणाचं बाळकडू मिळाल्याने त्यांनी प्रथम आणि स्नेहा या स्वयंसेवी संस्थेत काम करून समाजकारणाला सुरुवात केली. 2015 मध्ये त्यांना यूएनडीपीने संयुक्त राष्ट्र राष्ट्र संमेलनात पाचारण करण्यात आलं होतं. एसजीबीटीआय समुदायाच्या प्रश्नावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

प्रेम विवाह

वर्षा गायकवाड यांचा प्रेमविवाह झालेला आहे. त्यांच्या पतीचं नाव राजू गोडसे असून त्यांनी आयसीडब्ल्यूएमधून एमबीएची पदवी घेतली आहे. त्यांनी काही काळ बहुराष्ट्रीय कंपन्या आणि खासगी बँकांमध्ये नोकरी केली. आता ते पूर्ववेळ धारावी मतदारसंघावर लक्ष ठेवून असतात.

विजय आणि मंत्रिपदे

2004मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात पाऊल टाकलं. त्यांनी 2004ची विधानसभा निवडणूक लढवली. धारावीतूनच त्यांनी निवडणूक लढवली. कारण धारावी हा काँग्रेसचा आणि त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचा बालेकिल्ला होता. पहिल्याच निवडणुकीत त्यांना यश आलं. त्यानंतर 2009मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या आणि थेट राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री झाल्या. 2010 ते 2014 या काळात त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणूनही काम केलं. त्यांनी हिंगोलीच्या पालकमंत्री म्हणूनही काम केलं आहे. तसेच मुंबई काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. (know about maharashtra’s first woman education minister varsha gaikwad)

धारावी प्रकल्पासाठी प्रयत्न

वर्षा गायकवाड या धारावीतील आमदार आहेत. धारावीतील गृहप्रकल्प पूर्ण करणं हे वर्षा गायकवाड आणि एकनाथ गायकवाड यांचं स्वप्न आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. येथील नागरिकांना हक्काचे घर मिळावे असं त्यांना वाटतं. त्यासाठीच त्यांचे या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू आहे. (know about maharashtra’s first woman education minister varsha gaikwad)

संबंधित बातम्या:

शिवसेना ते शिवसेना, व्हाया राष्ट्रवादी; असा आहे भास्कर जाधवांचा राजकीय प्रवास!

बिनधास्त बबनराव लोणीकर, वाद आणि बरंच काही; वाचा, सविस्तर

कारखान्यातील स्लिप बॉय ते ठाकरे सरकारमध्ये मंत्री; वाचा, संदीपान भुमरेंचा थक्क करणारा प्रवास!

(know about maharashtra’s first woman education minister varsha gaikwad)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें