AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ते शिवसेना, व्हाया राष्ट्रवादी; असा आहे भास्कर जाधवांचा राजकीय प्रवास!

राज्यातील अभ्यासू आणि तितकेच आक्रमक नेते म्हणून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची ओळख आहे. (know about bhaskar jadhav, starting new innings)

शिवसेना ते शिवसेना, व्हाया राष्ट्रवादी; असा आहे भास्कर जाधवांचा राजकीय प्रवास!
भास्कर जाधव
| Updated on: Apr 09, 2021 | 8:23 PM
Share

मुंबई: राज्यातील अभ्यासू आणि तितकेच आक्रमक नेते म्हणून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची ओळख आहे. आक्रमकता, बंड हा जाधव यांचा स्वभाव धर्म आहे. त्यामुळेच विरोधकच नव्हे तर स्वपक्षीयांविरोधातही बंड पुकारताना महाराष्ट्राने त्यांना पाहिलं आहे. भास्कर जाधव यांचा राजकीय प्रवास कसा आहे? त्यावर टाकलेला हा प्रकाश… (know about bhaskar jadhav, starting new innings)

1982 पासून शिवसेनेतून सुरुवात

भास्कर जाधव यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने 1982 पासून सुरुवात झाली. त्यांनी शिवसैनिक म्हणून पक्षात कामाला सुरुवात केली. 1995 ते 2004 दरम्यान ते चिपळूणमधून दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले. शिवसेनेत असताना त्यांनी अनेकपदेही भूषवली. जाधव कुशल संघटक आहेत. प्रभावी वक्ते आहेत. दांडगा लोकसंपर्क असलेले नेते आहेत. तसेच मराठा समाजातून आल्याने या समाजातील ते लोकप्रिय नेतेही आहेत.

अपक्ष लढले, पराभूत झाले

जाधव यांना 2004मध्ये शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीतून त्यांनी 2009मध्ये विधानसभा निवडणूक लढवून तेव्हाचे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला. या निवडणुकीनंतर जायटं किलर अशी त्यांची इमेज तयार झाली.

म्हणून उमेदवारी नाकारली

2004च्या निवडणुकीवेळी शिवसेनेने एक सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेनुसार जाधव पराभूत होतील, असं शिवसेनेला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे जाधवांना उमेदवारीसाठी मातोश्रीवर ताटकळत ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या जाधवांनी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करत शिवसेना सोडली आणि अपक्ष उमदेवार म्हणून रिंगणात उतरले होते. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे हाती घेतल्यानंतर जाधव यांच्या रुपाने शिवसेनेत झालेलं हे पहिलंच बंड होतं. जाधव यांच्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता.

नऊ खात्यांचे कारभारी

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात ते नगरविकास मंत्री झाले. त्यावेळी त्यांच्याकडे एक-दोन नव्हे तर नऊ खात्यांचा पदभार देण्यात आला होता.

सेना सोडली, घड्याळ बांधली

भास्कर जाधव यांनी 2004मध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेकडून अन्याय होत असल्याचं कारण देत नाही, शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर ते राज्यात नगरविकास मंत्री झाले होते. शिवाय काही काळ त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपदही भूषविले होते.

उद्धव ठाकरेंची ऑफर

2019च्या निवडणुकीपूर्वी जाधव यांनी अचानक राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. तब्बल 15 वर्षानंतर ते स्वगृही परतले होते. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला निमंत्रण दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ठाकरेंच्या ऑफर नंतर जाधव यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर ते 2019मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर गुहागरमधून निवडूनही आले.

संधी हुकली

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली तीन पक्षाचं सरकार बनल्यानंतर शिवसेनेकडून बहुतेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. यावेळी राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तीन पक्षाच्या सरकारमध्ये जाधव यांना संधी मिळाली नाही. त्यांची संधी हुकली. त्यामुळे ते नाराज झाले होते. त्यातच मुख्यमंत्र्यांचा मध्यंतरी कोकणात दौरा झाला. त्यावेळी राजशिष्टाचारानुसार जाधव यांना सन्मान दिला गेला नाही, त्यामुळे ते आणखीनच नाराज झाले होते. (know about bhaskar jadhav, starting new innings)

नवी इनिंग

शिवसेनेत येऊनही मंत्रीपद न मिळालेल्या जाधवांकडे शिवसेनेने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेने त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याऐवजी भास्कर जाधव यांच्याकडे हे पद सोपवून त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यात आलं आहे. त्यामुळे जाधव यांची नवी इनिंग सुरू झाल्याचं बोललं जातं. (know about bhaskar jadhav, starting new innings)

संबंधित बातम्या:

बिनधास्त बबनराव लोणीकर, वाद आणि बरंच काही; वाचा, सविस्तर

कारखान्यातील स्लिप बॉय ते ठाकरे सरकारमध्ये मंत्री; वाचा, संदीपान भुमरेंचा थक्क करणारा प्रवास!

छात्रसंघाचे सरचिटणीस ते माजी अर्थमंत्री; ‘सुधीर मुनगंटीवार’ विदर्भातील लढवय्या नेता

(know about bhaskar jadhav, starting new innings)

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.