AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान!!! शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देतो म्हणत घरमालकाला घातला 4 लाखांचा गंडा, भाडेकरू फरार

घरमालकांचा मोबाइल व इतर माहितीचा गैरवापर करून आरोपी भाडेकरू मनोजने विविध बँकांतून ऑनलाइन 4 लाख 25 हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यापैकी तीन लाख 85 हजार रुपये स्वतःच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात वळते केले.

सावधान!!! शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देतो म्हणत घरमालकाला घातला 4 लाखांचा गंडा, भाडेकरू फरार
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 11, 2021 | 11:06 AM
Share

औरंगाबाद: शहरातील सातारा परिसरातील एका भाडेकरूने तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चांगलाच फायदा करून देतो, असा भूलथापा मारत घरमालकाला तब्बल 4 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले (Tenant cheated the landlord) आहे. आधी ऑनलाइन शॉपिंगचे व्यवहार (Online shopping) करून देण्यासाठी घरमालकांचा मोबाइल वारंवार वापरल्यानंतर काही दिवसातच भाडेकरून घरमालकांची बँकेची माहिती मिळवून परस्पर त्यांच्या नावे कर्जही घेऊन टाकले. कर्जाची रक्कम नंतर स्वतःच्या खात्यात जमा केली. फसवणूक झाल्याचे कळताच घरमालकांनी पोलिसात धाव घेतली. मात्र तोपर्यंत भाडेकरू फरार झाला.  त्यामुळे आपला मोबाइल कोणत्याही पैशांच्या व्यवहारासाठी इतरांच्या हाती देताना सावधगिरी बाळगणे किती आवश्यक आहे, हेच यावरून लक्षात येते.

ऑनलाइन वस्तू मागवून देत होता

सातारा परिसरातील लक्ष्मी रेसिडेन्सीमध्ये राहणारे 60 वर्षीय रमेश नानुलाल मिश्रा यांच्याकडे मनोज घोडके हा तरुण भाडेतत्त्वावर राहत होता. नोकरीनिमित्त शहरात आलेल्या मनोजने सुरुवातीला मिश्रा यांना शेअर मार्केटविषयी माहिती देण्यास सुरुवात केली. त्यांना ऑनलाइन संकेतस्थळावरून वस्तू मागवून देऊ लागला. तसेच बँकेची इतरही ऑनलाइन कामे तो करून देऊ लागला. हे करताना मिश्रा यांचा मोबाइल तो सराइतपणे हाताळू लागला. काही दिवसांनी तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असा सल्ला देत मनोजने मिश्रा यांना डीमॅट खाते उघडायला सांगितले. त्याचे ओटीपी, पासवर्ड ही सगळी माहिती मनोजकडेच होती.

गुंतवणूक मागे घेवून कर्जही घेतले

2019 या वर्षातील जून, जुलै आणि ऑगस्ट या काळात मनोजने मिश्रा यांच्या डीमॅट खात्यात व्यवहार केला. मात्र शेअर मार्केटमधून चांगला परतावा येत नसल्यामुळे त्यांनी गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही मनोजने मिश्रा यांचा मोबाइल व इतर माहितीचा गैरवापर करून विविध बँकांतून ऑनलाइन 4 लाख 25 हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यापैकी तीन लाख 85 हजार रुपये स्वतःच्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात वळते केले. हा प्रकाकर मिश्रा यांना कळाल्यावर त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव सानप हे या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

आपली गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका

ज्येष्ठ नागरिकांना मोबाइल शिकवण्याच्या बहाण्याने त्यांचा मोबाइल आणि गोपनीय माहिती हस्तगत करून गैरप्रकार झाल्याची अनेक प्रकरणे याआधीही उघडकीस आली आहेत. तरीही नागरिकांनी अशा व्यवहारांबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, त्यांच्यासोबत मुलगा किंवा इतर कुणी तरुण मुले राहत नाहीत त्यांनी अशा गोष्टींमध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे. (Young tenant cheated the landlord by pretending to make a profit in the stock market, Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या- 

Aurangabad Crime: खिशात मोबाइल, काखेत ट्रान्समीटर, कानात मख्खी एअरफोन, औरंगाबादेत पोलिस चालक परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचे उघड

Aurangabad Crime: कारमध्ये पैशांची बॅग ठेवून मंदिरात दर्शनासाठी गेले, वैजापुरात कांदा व्यापाऱ्याची सहा लाख रुपयांची बॅग पळवली  

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ