AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यावर चालताना मोबाईल घेऊन पळायचे, औरंगाबादेत दोन अट्टल चोरांना बेड्या

निर्मनुष्य रस्त्यावर एकटे जाणाऱ्या लोकांच्या बाजूने हे चोर स्पोर्ट्स बाईक घेऊन येत. बोलणाऱ्याच्या हातातील मोबाईल अचानकपणे हिसकावून घेत आणि क्षणार्धात रस्त्यावरून पसार होत असत.

रस्त्यावर चालताना मोबाईल घेऊन पळायचे, औरंगाबादेत दोन अट्टल चोरांना बेड्या
स्पोर्ट्सबाईकवरून मोबाईल चोरणारे ताब्यात घेतलेले दोघे
| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 6:27 PM
Share

औरंगाबाद : रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी चालताना मोबाईलवर बोलत जात असाल तर सावधान. शहरात अशा पायी चालणाऱ्यांच्या हातातील मोबाईल (moblie) हिसकावून घेणारी टोळी सक्रीय आहे. शहरातील स्थानिक गुन्हे शाखेने अशाच दोन चोरांना ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत असून नुकतेच  मोबाईल हिसकावून घेणाऱ्या दोघांना औरंगाबाद गुन्हे शाखेने (Aurangabad crime branch) गुरुवारी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हे दोघे रात्रीचा अंधार आणि रस्त्यावरील शुकशुकाटाचा फायदा घेत हे चोरीचे कृत्य करत होते. निर्मनुष्य रस्त्यावर एकटे जाणाऱ्या लोकांच्या बाजूने हे चोर स्पोर्ट्स बाईक घेऊन येत. बोलणाऱ्याच्या हातातील मोबाईल अचानकपणे हिसकावून घेत आणि क्षणार्धात रस्त्यावरून पसार होत असत. अशा प्रकारे चोरी झाल्याच्या तक्रारी छावणी पोलिस ठाणे आणि क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.  त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. (Aurangabad Crime Branch police arrested Two young boys in mobile snatching case)

दोघे जण ताब्यात

या प्रकरणी पोलिसांना 25 ऑगस्ट रोजी तांत्रिक माहिती हाती लागली. त्यानुसार, पल्सर मोटरसायकलवरील अज्ञात आरोपीचा शोध पोलिसांनी सुरु केला होता.  या तपासात चोरीचा मोबाईल विकला जात असल्याचे कळले.  तपासानंतर मोबाईल चोरून विक्री करणाऱ्या दोघांना छावणी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नावे अर्जुन राजेश दणके आणि अजय किशोर जाधव अशी आहेत. हे दोघेही वाळूज येथील रहिवासी असून पोलिसांनी गुल्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली. त्यात त्यांनी औरंगाबाद शहरात येऊन रात्री चोरी केल्याचे मान्य केले. यातील अर्जुन राजेश दणके याचे वाळूज येथे आरजू मॉडर्न शॉप आहे.

स्पोर्ट्स बाईकवरून चोरी

अर्जुन दणके आणि अजय जाधव हे दोघे अजय जाधवच्या मालकीची पल्सर मोटरसायकल क्रमांक MH12 PM1340 घेऊन विद्यापीठ गेट ते कॉलेज रोड, निरालाबाजार ते विवेकानंद कॉलेज रोड, सिटीचौक या ठिकाणी फिरले. या रस्त्यात मोबाइलवर बोलत जात असणाऱ्या एकट्या व्यक्तींना हेरून अचानकपणे त्यांच्या हातातून मोबाइल हिसकावून घेतले.

1 लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल व 6 मोबाइल जप्त

संबंधित आरोपींनी आपल्या चोरी केल्याची कबूली दिली आहे.  पोलिसांनी या दोघांच्या ताब्यातून 1,38000 रुपयांचा मुद्देमाल आणि 06 मोबाइल ताब्यात घेतले. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटार सायकलदेखील जप्त केली. या दोघांनाही पोलिस ठाणे छावणी येथे तपासाकरिता हजर करण्यात आले.

पंढरपूर MIDC भागातही त्याच पद्धतीने चोरी

तपासात उघड झालेली अधिक माहिती अशी की, वाळूज भागात स्वप्नील केदारे आणि विधी संघर्षबालक या दोघांनीही अशाच प्रकारे स्पोर्ट्स बाईकचा वापर करून चोरी केली. या दोघांकडून 63,000 रुपये किंमतीचे मोबाईल तसेच 1,98,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

इतर बातम्या: 

औरंगाबादेत बाईक चोरुन जालन्यात विक्री, अट्टल चोराच्या मुसक्या आवळल्या

रिक्षातून चोर आले, रांगेतील चार दुकानं फोडली, इतक्यात आरडाओरड झाली आणि…

(Aurangabad Crime Branch police arrested Two young boys in mobile snatching case)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.